ललिता बाबर, अरोक्या राजीव उत्कृष्ट खेळाडू

By Admin | Published: September 19, 2015 10:14 PM2015-09-19T22:14:58+5:302015-09-19T22:14:58+5:30

महाराष्ट्राची आणि रेल्वेत कार्यरत असलेली ललिता बाबर आणि सेनादलाच्या अरोक्या राजीवला ५५ व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा

Lalitha Babar, Arokya Rajeev topper | ललिता बाबर, अरोक्या राजीव उत्कृष्ट खेळाडू

ललिता बाबर, अरोक्या राजीव उत्कृष्ट खेळाडू

googlenewsNext

कोलकाता : महाराष्ट्राची आणि रेल्वेत कार्यरत असलेली ललिता बाबर आणि सेनादलाच्या अरोक्या
राजीवला ५५ व्या राष्ट्रीय खुल्या
मैदानी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा
मान देण्यात आला. वेगवान
धावपटू रेल्वेच्या दूती चंदने
शनिवारी महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट संपादन केला. दूतीने आधी १०० मीटरची शर्यत जिंकली होती.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघांतर्गत आयोजित या स्पर्धेत रेल्वे संघाने २६७ गुण संपादन करून सर्वसाधारण आणि १८४ गुणांसह महिलांचे विजेतेपद जिंकला. सेनादलाच्या संघाला १७४.५ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टिंटू लुकाने २ मिनिटे ५६ सेकंदांची वेळ नोंदवून नवीन स्पर्धाविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले.
(वृत्तसंस्था)

महिलांच्या २०० मी. धावण्याच्या शर्यतीत दूती चंदने २३.६९ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्ण आपल्या नावावर केले. श्रावणी नंदाला (२३.७५ से.) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Web Title: Lalitha Babar, Arokya Rajeev topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.