लंकेचा फेब्रुवारीत भारत दौरा

By admin | Published: January 22, 2016 02:56 AM2016-01-22T02:56:42+5:302016-01-22T02:56:42+5:30

पुढील महिन्यात श्रीलंका तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ९ फेब्रुवारीला पहिली लढत होणार आहे

Lanka tour of India in February | लंकेचा फेब्रुवारीत भारत दौरा

लंकेचा फेब्रुवारीत भारत दौरा

Next

मुंबई : पुढील महिन्यात श्रीलंका तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ९ फेब्रुवारीला पहिली लढत होणार आहे.
या मालिकेतील दुसरी लढत दिल्लीत १२ फेब्रुवारीला, तर विशाखापट्टणम् येथे १४ फेब्रुवारीला तिसरी लढत होईल.
भारतात येत्या ८ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. भारताने २०१४ मध्ये श्रीलंकेला नमवूनच टी-२० विश्वचषक स्पर्धेचा किताब जिंकला होता.
सध्या भारत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, तेथे पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ४-० ने पिछाडीवर आहे. यातील अंतिम सामना २३ जानेवारीला होईल.

Web Title: Lanka tour of India in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.