स्टोक्स व मिल्सला मोठी रक्कम

By admin | Published: February 21, 2017 12:54 AM2017-02-21T00:54:45+5:302017-02-21T00:54:45+5:30

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सोमवारी आयपीएल खेळाडूंच्या लिलावामध्ये सर्वांत महागडा खेळाडू ठरला. रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स

Large amount of stokes and mills | स्टोक्स व मिल्सला मोठी रक्कम

स्टोक्स व मिल्सला मोठी रक्कम

Next

बंगळुरू : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सोमवारी आयपीएल खेळाडूंच्या लिलावामध्ये सर्वांत महागडा खेळाडू ठरला. रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स संघाने त्याला १४ कोटी ५० लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले, तर युवा स्थानिक खेळाडूंवरही फ्रँचायसींनी मोठ्या रकमेची बोली लावली. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज तिमल मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १२ कोटी रुपयांना विकत घेतले.
अफगाणिस्तानचा युवा लेगस्पिनर राशिद खान अरमानसाठी सनरायझर्स हैदराबादने चार कोटी रुपयांची बोली लावली, तर अष्टपैलू फिरकीपटू मोहम्मद नबी यालाही सनरायझर्सने करारबद्ध केले.
भारताचा उदयोन्मुख खेळाडू तमिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने तीन कोटी रुपये खर्च केले. त्याची मूळ किंमत केवळ १० लाख रुपये होती.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाला नेटमध्ये गोलंदाजी करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरीसाठी आरसीबीने दोन कोटी रुपये खर्च केले, तर कर्नाटकचा युवा आॅफस्पिनर कृष्णप्पा गौतमवर मुंबई इंडियन्सने दोन कोटी रुपयांची बोली लावली.
भारतीय कसोटी संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरॉनला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने २ कोटी ८० लाख रुपयांना करारबद्ध केले, तर लेगस्पिनर कर्ण शर्मा तीन कोटी २० लाख रुपयांमध्ये मुंबई संघासोबत जुळला.
डावखुरा फिरकीपटू पवन नेगी याला आरसीबी संघाने एक कोटी रुपयांना करारबद्ध केले. त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. गेल्या वर्षी त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून ८ कोटी ५० लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते. त्या तुलनेत ही रक्कम अल्प आहे.
आजचा दिवस खऱ्या अर्थाने इंग्लंडच्या खेळाडूंचा होता. स्टोक्स सर्वांत महागडा खेळाडू ठरला, तर मिल्स त्याच्या जवळपास पोहोचण्यात यशस्वी ठरला. हे दोन्ही खेळाडू आयपीएलच्या दहाव्या पर्वातील लिलावामध्ये मिलियन डॉलर क्रिकेटपटू ठरले. इंग्लंडच्या ख्रिस व्होक्सवर कोलकाता नाईट रायडर्सने ४ कोटी २० लाख रुपयांची बोली लावली.
पुणे संघाचे मालक संजीव गोयंका यांनी स्पष्ट केले, की
स्टोक्सवर मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे, याची त्यांना कल्पना होती. तो पूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध राहणार नाही, याचीही कल्पना आहे.
पुणे संघाने अखेर मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना पिछाडीवर सोडत स्टोक्सला करारबद्ध करण्यात यश मिळवले. स्टोक्सवर बोली लावण्यापूर्वी पुणे संघाने कर्णधार स्टीव्हन स्मिथचा सल्ला घेतला का, याबाबत बोलताना गोयंका म्हणाले, की प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगसह सर्व जण या निर्णयात सहभागी होते.
इंग्लंडचा इयान मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने त्याची मूळ किंमत दोन कोटी रुपयांना करारबद्ध केले. अष्टपैलू वेगवान गोलंदाज स्टोक्सला करारबद्ध करण्यासाठी पाच फ्रँचायसींनी बोली लावली. स्टोक्सने अद्याप फ्रँचायसी क्रिकेट खेळलेले नाही. त्याचा ७७ टी-२० सामन्यांमध्ये स्ट्राईक रेट १३४ पेक्षा अधिक आहे, तर गोलंदाजीमध्ये प्रतिषटक सरासरी ८.६० ची आहे.
स्टोक्ससाठी सुरुवातीला मुंबई, दिल्ली व आरसीबी या संघांनी बोली लावली. बोली १० कोटी ५० लाख रुपयांपर्यंत गेल्यानंतर मुंबई संघाने माघार घेतली. दिल्ली व बंगळुरू संघांदरम्यान बोलीसाठी चढाओढ कायम होती. त्यानंतर सनरायझर्स संघ यात सहभागी झाला. स्टोक्स १२ कोटी ५० लाख रुपयांना विकला जाईल, असे वाटत असताना पुणे संघ मैदानात उतरला. स्टार्कने रविवारी आयपीएलमधून माघार घेतली.
न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरी अँडरसन व श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांना दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्यांच्या मूळ किमतीमध्ये करारबद्ध केले. त्यांची मूळ किंमत अनुक्रमे एक कोटी व दोन कोटी रुपये होती.
दिल्ली डेअरडेव्हिल्सने  दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला पाच कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले, तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसाठी केकेआरने पाच कोटी रुपये खर्च केले. (वृत्तसंस्था)

इरफान, पुजारा व इशांतला तुर्तास बोली नाही

चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांच्यासारख्या सीनिअर कसोटीपटूंमध्ये कुणीच रस दाखविला नाही. या दोघांची मूळ किंमत अनुक्रमे ५० लाख व २ कोटी रुपये होती. इरफान पठाण केवळ जानेवारी ते जून महिन्यापर्यंतचा क्रिकेटपटू आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी तो चांगली कामगिरी करतो. इरफानच्या गोलंदाजीमध्ये पूर्वीप्रमाणे वेग नाही. तो आक्रमक फलंदाजही नाही. मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने एक-दोन चांगल्या खेळी केल्या, पण फ्रॅन्चायझी मालकांना आकर्षित करण्यात तो अपयशीच ठरला.


 खरेदी झालेले खेळाडू : ६६
 फ्रेंचाइजीकडून खर्च झालेली रक्कम : ९१.१५ करोड रुपये
 भारतीय खेळाडूंची झालेली खरेदी : ३९
 विदेशी खेळाडूंची झालेली खरेदी : २७
 सर्वाधिक खरेदी केलेला संघ : गुजरात लायन्स (११ खेळाडू)
 कमी खरेदी केलेला संघ : रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (५ खेळाडू)

अफगाणचे नबी, खान यांनी आयपीएलमध्ये इतिहास घडविला

अफगाणिस्तानच्या क्रिकेटमध्ये सोमवारी नव्या अध्यायाची नोंद झाली. मोहम्मद नबी व राशिद खान इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये करारबद्ध होणारे या देशाचे पहिले क्रिकेटपटू ठरले. नबी व खान यांना सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. नबीला ३० लाख व खान याला चार कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले. अफगाणिस्तानचे पाच क्रिकेटपटू प्रथमच लिलावामध्ये सहभागी झाले होते.

गुजरात लायन्स 
खेळाडूदेशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली

जेसन रॉयइंग्लंडबॅट्समन1 कोटी 1 कोटी
बासिल थम्पीभारतबॉलर10 लाख85 लाख
मनप्रीत गोनीभारतबॉलर30 लाख60 लाख
नाथू सिंगभारतबॉलर30 लाख50 लाख
मुनाफ पटेलभारतबॉलर30 लाख30 लाख
टीएस बरोकाभारतबॉलर10 लाख10 लाख
चिराग सूरीयूएईबॅट्समन10 लाख10 लाख
शैली शौर्यभारतबॉलर10 लाख10 लाख
शुभम अग्रवालभारतबॉलर10 लाख10 लाख
प्रथम सिंगभारतआॅलराउंडर10 लाख10 लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
खेळाडूदेशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली

तिमल मिल्सइंग्लंडबॉलर50 लाख12 कोटी
अनिकेत चौधरीभारतबॉलर10 लाख2 कोटी
पवन नेगीभारतआॅलराउंडर30 लाख1 कोटी
बिली स्टेनलेकआॅस्ट्रेलियाबॉलर30 लाख30 लाख
प्रवीण दुबेभारतआॅलराउंडर10 लाख10 लाख
रायझिंग पुणे सुपरजाएंट्स  
खेळाडूदेशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली

बेन स्टोक्सइंग्लंडआॅलराउंडर2 कोटी14.5 कोटी
डॅनियल क्रिस्टियनआॅस्ट्रेलियाआॅलराउंडर1 कोटी1 कोटी
जयदेव उनाडकटभारतबॉलर30 लाख30 लाख
राहुल चहरभारतबॉलर10 लाख10 लाख
सौरभ कुमारभारतबॉलर10 लाख10 लाख
मिलिंद टंडनभारतआॅलराउंडर10 लाख10 लाख
राहुल त्रिपाठीभारतबॉलर10 लाख10 लाख
कोलकाता नाइटरायडर्स  
खेळाडूदेशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली
ट्रेन्ट बोल्टन्यूझिलंडबॉलर1.5 कोटी5 कोटी
क्रिस व्होक्सइंग्लंडआॅलराउंडर2 कोटी4.2 कोटी
नॅथन कोल्टर-नाईलआॅस्ट्रेलियाबॉलर1 कोटी3.5 कोटी
ऋषी धवनभारतआॅलराउंडर30 लाख55 लाख
रोवमॅन पॉवेलवेस्ट इंडिजआॅलराउंडर30 लाख30 लाख
संजय यादवभारतआॅलराउंडर10 लाख10 लाख
इशांक जग्गीभारतबॉलर10 लाख10 लाख
दिल्ली डेअरडेव्हिल्स 
खेळाडूदेशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली

कॅगिसो रबाडाआफ्रिकाबॉलर1 कोटी5 कोटी
पॅट कमिंसआॅस्ट्रेलियाबॉलर2 कोटी4.5 कोटी
अँजिलो मॅथ्यूजश्रीलंकाआॅलराउंडर2 कोटी2 कोटी
कोरी अँडरसनन्यूझिलंडआॅलराउंडर1 कोटी1 कोटी
एम. आश्विनभारतबॉलर10 लाख1 कोटी
नवदीप सैनीभारतबॉलर10 लाख10 लाख
शशांक सिंगभारतआॅलराउंडर10 लाख10 लाख
अंकित बावनेभारतफलंदाज10 लाख10 लाख
किंग्ज इलेव्हन पंजाब  
खेळाडूदेशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली

टी. नटराजनभारतबॉलर10 लाख3 कोटी
वरुण अ‍ॅरॉनभारतबॉलर10 लाख2.8 कोटी
इयान मॉर्गनइंग्लंडफलंंदाज2 कोटी2 कोटी
मॅट हेनरीन्यूझीलंडबॉलर50 लाख50 लाख
मार्टिन गुप्टिलन्यूझीलंडबॅट्समन50 लाख50 लाख
राहुल तेवतियाभारतआॅलराउंडर10 लाख25 लाख
डॅरेन सॅमीवेस्ट इंडिजआॅलराउंडर30 लाख30 लाख
सनराइजर्स हैदराबाद 
खेळाडू देशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली
राशिद खानअफगाणबॉलर50 लाख4 कोटी
मोहम्मद सिराजभारतबॉलर20 लाख2.6 कोटी
एकलव्य द्विवेदीभारतविकेटकीपर30 लाख75 लाख
क्रिस जॉर्डनइंग्लंडआॅलराउंडर50 लाख50 लाख
मोहम्मद नबीअफगाणआॅलराउंडर30 लाख20 लाख
बेन लाघलिनआॅस्ट्रेलियाबॉलर30 लाख30 लाख
तन्मय अग्रवालभारतफलंदाज10 लाख10 लाख
प्रवीण तांबेभारतबॉलर10 लाख10 लाख
मुंबई इंडियन्स  
खेळाडूदेशप्रकारमूळ किंमतकिंमत मिळाली
कर्ण शर्माभारतआॅलराउंडर30 लाख3.2 कोटी
कृष्णप्पा गौतमभारतआॅलराउंडर10 लाख2 कोटी
मिशेल जॉन्सनआॅस्ट्रेलियाबॉलर2 कोटी2 कोटी
निकोलस पूरनवेस्ट इंडिजविकेटकीपर30 लाख30 लाख
सौरभ तिवारीभारतबॅट्समन30 लाख30 लाख
ए. गुणरत्नेश्रीलंकाबॅट्समन30 लाख30 लाख
कुलवंत खेजरोलियाभारतबॉलर10 लाख10 लाख

Web Title: Large amount of stokes and mills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.