मीराबाई चानूकडे सोपविले भारताचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 03:31 AM2019-04-20T03:31:46+5:302019-04-20T03:31:58+5:30
माजी विश्वविजेती मीराबाई चानू शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करेल.
निगबो(चीन) : माजी विश्वविजेती मीराबाई चानू शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या आशियाई अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करेल. आॅलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्टÑीय वेटलिफ्टिंग महासंघाने वजन गटात बदल केल्यानंतर ४८ ऐवजी ४९ किलो गटात सहभागी होणारी मीराबाई सुवर्णाची प्रबळ दावेदार आहे. पाठदुखीमुळे जवळपास नऊ महिन्यानंतर ती पुनरागमन करेल.
थायलंड ईजीएटी चषकात फेब्रुवारीत मीराबाईने स्रॅचमध्ये ८० तसेच क्लीन अॅन्ड जर्क प्रकारात ११० किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. तिची सर्वोत्कृष्ट कामगिरी १९६ किलो असून यात सुधारणा करण्याचे तिच्यापुढे आव्हान असेल. पुरुष गटात देशाच्या नजरा युवा आॅलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिननुंगा याच्या कामगिरीकडे असतील.