मिताली, हरमनप्रीतकडे नेतृत्व
By admin | Published: October 29, 2016 11:19 PM2016-10-29T23:19:22+5:302016-10-29T23:19:22+5:30
हरमनप्रीत कौर हिच्याकडे मिताली राजऐवजी भारतीय महिला टी-२० क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. वन-डे संघाच्या कर्णधारपदी मात्र मिताली कायम राहील.
नवी दिल्ली : हरमनप्रीत कौर हिच्याकडे मिताली राजऐवजी भारतीय महिला टी-२० क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. वन-डे संघाच्या कर्णधारपदी मात्र मिताली कायम राहील. वेस्ट इंडिजविरुद्ध १० नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या टी-२० तसेच थायलंडमध्ये आयोजित आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला. टी-२० विश्वचषकाच्या वेळी मिताली संघाची कर्णधार होती. (वृत्तसंस्था)
वन-डे संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, टी. कामिनी, मोना मेश्राम, वेदा कृष्णमूर्र्ती, देविका वैद्य, सुषमा वर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, सुकन्या परिदा, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा.
टी-२० संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, एस. मेघना, वनिता व्ही. आर., अनुजा पाटील, वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा, नूजहत परवीन, पूनम यादव, एकता बिश्त, प्रीती बोस, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी.