विश्वचषकासाठी दुखापतग्रस्त क्लार्ककडे नेतृत्व

By admin | Published: January 12, 2015 01:30 AM2015-01-12T01:30:16+5:302015-01-12T01:30:16+5:30

सध्या दुखापतग्रस्त स्टार फलंदाज मायकल क्लार्क यांच्याकडे आगामी वन-डे विश्वचषकासाठी आॅस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले

Leading to Clarke injured for World Cup | विश्वचषकासाठी दुखापतग्रस्त क्लार्ककडे नेतृत्व

विश्वचषकासाठी दुखापतग्रस्त क्लार्ककडे नेतृत्व

Next

सिडनी : सध्या दुखापतग्रस्त स्टार फलंदाज मायकल क्लार्क यांच्याकडे आगामी वन-डे विश्वचषकासाठी आॅस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे; मात्र तत्पूर्वी त्याला आपले फिटनेस सिद्ध करावे लागणार आहे़ कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन याला मात्र या संघात स्थान मिळू शकले नाही़
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित विश्वचषक १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे़ विश्वचषकासाठी घोषित कांगारू संघच भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे़ ही तिरंगी मालिका १६ जानेवारीपासून खेळविण्यात येणार आहे़ आॅस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ते रॉड मार्श म्हणाले, विश्वचषकासाठी क्लार्कचीच कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे; मात्र त्याआधी त्याला तंदुरुस्त चाचणीला सामोरे
जावे लागेल़ जर विश्वचषकापर्यंत क्लार्क तंदुरुस्त झाला नाही, तर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जॉर्ज बेली याच्याकडे सोपविण्यात येईल़ आॅस्ट्रेलिया संघात झेविअर डोहर्टी अनुभवी फिरकी गोलंदाज असल्यामुळे नॅथन लियॉनला संधी मिळाली नाही, असेही मार्श यांनी सांगितले़
क्लार्क मुकण्याची शक्यता
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याला आॅस्ट्रेलियन निवड समितीने फिटनेस सिद्ध करण्यासाठी अल्टीमेटम दिले आहे़ दिलेल्या मुदतीत फिटनेस सिद्ध न केल्यास क्लार्कला विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे़
विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या आॅस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदी क्लार्क याची निवड करण्यात आली आहे़ मात्र त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत फिटनेस सिद्ध करण्याची मुदत दिली आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार, क्लार्क २१ फेब्रुवारीपर्यंत आपला फिटनेस सिद्ध करू शकणार नाही अशी चर्चा आहे़ त्यामुळे क्लार्क विश्वचषकला मुकणार हे जवळपास निश्चित झाले आहे़ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Leading to Clarke injured for World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.