लिएंडरला कृष्णन यांचा विक्रम मोडायचा आहे - डॉ. वेस पेस

By admin | Published: July 22, 2016 08:05 PM2016-07-22T20:05:38+5:302016-07-22T20:05:38+5:30

लिएंडरने स्वत:चे काही लक्ष्य ठरवले आहेत. त्याला केवळ आॅलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक जिंकायचे नसून डेव्हीस चषक स्पर्धेतील रामनाथन कृष्णन यांचा सर्वाधिक एकेरी सामने

Leander wants to record Krishnan's name - Dr. Wes Pace | लिएंडरला कृष्णन यांचा विक्रम मोडायचा आहे - डॉ. वेस पेस

लिएंडरला कृष्णन यांचा विक्रम मोडायचा आहे - डॉ. वेस पेस

Next

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि.22 -  लिएंडरने स्वत:चे काही लक्ष्य ठरवले आहेत. त्याला केवळ आॅलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक जिंकायचे नसून डेव्हीस चषक स्पर्धेतील रामनाथन कृष्णन यांचा सर्वाधिक एकेरी सामने विजयाचा विक्रमही मोडायचा आहे, असे भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसचे वडिल डॉ. वेस पेस यांनी सांगितले.
लिएंडर विक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहे. आपल्या मुलाविषयी बोलताना डॉ. पेस म्हणाले की, लिएंडरला दुसऱ्या वैयक्तिक आॅलिम्पिक पदक जिंकण्यासह दिग्गज रामनाथन कृष्णन यांचा सर्वाधिक डेव्हीस कप सामने जिंकण्याचा विक्रमही मोडायचा आहे.ह्णह्ण परंतु, सध्या लिएंडर एकेरी ऐवजी दुहेरी खेळत असल्याने याबाबत डॉ. पेस म्हणाले की, तो नक्कीच मोठ्या काळापासून एकेरी खेळला नाही, मात्र त्याने अनेक विक्रम नोंदवले आहेत. तो स्वत: स्वत:चे लक्ष्य ठरवतो. चंडिगड येथे झालेल्या डेव्हीस कप स्पर्धेत तो औचपारिक ठरलेल्या एकेरी सामन्यात खेळणार होता. परंतु, आॅलिम्पिकवर अधिक लक्ष केंद्रीत असल्याने त्याने आपला विचार बदलला. त्यामुळेच पुन्हा एकदा एकेरी खेळण्याची त्याला आशा आहे.
वेळेनुसार लिएंडर परिपक्व होत गेला. तो सुरुवातीला खूप आक्रमक होता, पण आता तो शांत झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तांत्रिकदृष्ट्या परिपक्व झाला आहे, असेही डॉ. पेस म्हणाले. दखल घेण्याची बाब म्हणजे गेल्या आॅलिम्पिकप्रमाणे यावेळेलाही पुरुष दुहेरी जोडीवरुन वाद निर्माण झाला होता. जागतिक क्रमवारीत १० वे स्थान पटकावून लिएंडरने आॅलिम्पिक तिकिट मिळवले होते. मात्र रोहन बोपन्नाने त्याच्यऐवजी युवा खेळाडू साकेत मायनेनी याला पसंती दिली होती. यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) मध्यस्ती करताना बोपन्ना - पेस अशी जोडी निश्चित केली. 

लिएंडर गेल्या २३ वर्षांपासून खेळत असून क्रीडा राजकारण चांगल्या पध्दतीने ओळखून आहे. आता देशासाठी वैयक्तिक मतभेदांना विसरण्याची वेळ आली आहे. वैयक्तिक मतभेदांपेक्षा देशासाठी खेळणे अधिक महत्त्वाचे आहे. रोहन देखील व्यावसायिक खेळाडू असून एखाद्या विशेष शैलीसह कशाप्रकारे ताळमेळ साधावा हे तो जाणतो. दोघेही एकसाथ खेळणार याचा मला आनंद आहे. आपल्याकडे सर्वोत्तम पुरुष दुहेरी जोडी असून यांच्याकडून आपण पदकाची अपेक्षा करु शकतो.
- डॉ. वेस पेस
------------------------------
- लिएंडर पेसने डेव्हीस कप स्पर्धेत ४८ एकेरी तर ४२ दुहेरी सामने जिंकले आहेत.
- रामनाथान कृष्णन यांनी या स्पर्धेत ५० एकेरी आणि १९ दुहेरी सामने जिंकले आहेत.
- लिएंडरला कृष्णन यांचा विक्रम मोडण्यासाठी २ एकेरी विजयांची आवश्यकता.
- लिएंडर आॅलिम्पिक इतिहासातील एकमेव पदक विजेता भारतीय आहे.

Web Title: Leander wants to record Krishnan's name - Dr. Wes Pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.