लिओनाल मेस्सी चषकाविना...!

By Admin | Published: June 20, 2015 12:07 AM2015-06-20T00:07:13+5:302015-06-20T00:07:13+5:30

स्टार फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी अर्जेंटिनासाठी आज शनिवारी १००वा सामना खेळणार आहे. कोपा अमेरिका स्पर्धेत जमैकाविरुद्धच्या लढतीत तो हा विक्रम नोंदवणार आहे.

Leonal Messi without a teaser ...! | लिओनाल मेस्सी चषकाविना...!

लिओनाल मेस्सी चषकाविना...!

googlenewsNext

चिली : स्टार फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी अर्जेंटिनासाठी आज शनिवारी १००वा सामना खेळणार आहे. कोपा अमेरिका स्पर्धेत जमैकाविरुद्धच्या लढतीत तो हा विक्रम नोंदवणार आहे. एकीकडे या शतकाचे सेलिब्रेशन होत असताना मेस्सीने आपल्या देशाला एकही चषक जिंकून दिलेला नाही, याचे शल्य त्याच्या मनाला बोचत असेल. हा टप्पा गाठताना मला अतिशय आनंद झाला आहे, या स्पर्धेचा चषक उंचावून हा आनंद द्विगुणित व्हावा असा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
मेस्सीने २00५ साली अंडर-२0 वर्ल्डकप आणि २00८चे आॅलिम्पिक (अंडर-२३) गोल्ड मेडल अर्जेंटिनाला जिंकून दिले आहे. आजमितीला फुटबॉल जगतातील सर्वाधिक यशस्वी खेळाडू असलेला मेस्सी वर्षाकाठी ७0 मिलियन अमेरिकन डॉलर्सची कमाई करतो. पण त्याच्या हातात वर्ल्डकप आलेला नाही की कोपा चषक नाही, त्यामुळे तो त्याच्या संघासाठी दुर्दैवी खेळाडू ठरल्याचे बोलले जाते. पण त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९९ सामन्यांत अर्जेंटिनासाठी ४६ गोल केले आहेत. बार्सिलोनाकडून त्याने ४१२ सामन्यांत ४८२ गोलची नोंद केली.
अर्जेंटिनाने १९९३ साली कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी मानाची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. मेस्सी, सेर्जीओ अग्युएरो, कार्लोस टेवेझ आणि इतर खेळाडू देशाचा २२ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या तयारीत आहेत.

पाच वेळा हार्टब्रेक
- मेस्सी २00६ साली पहिला विश्वचषक खेळला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात त्यांना जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले होते.
- २00७ साली व्हेनेझुएल्ला येथे झालेल्या कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने अर्जेंटिनाला हरवून चषक जिंकला. ही मेस्सीची पहिली कोपा अमेरिका स्पर्धा होती.
- २0१0च्या विश्वचषकातही २00६ची पुनरावृत्ती झाली. जर्मनीने त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले.
- २0११ची कोपा अमेरिका स्पर्धा मायदेशात होेऊनही अर्जेंटिनाला विजेतेपद मिळविता आले नाही.
- २0१४च्या विश्वचषकात चार गोल नोंदवून मेस्सीने अर्जेटिनाला अंतिम फेरी गाठून दिली. पण जर्मनीच्या मारिओ गोएटेझने ११३व्या मिनिटाला गोल नोंदवून मेस्सीच्या स्वप्नाचा चुराडा केला.

Web Title: Leonal Messi without a teaser ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.