200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य, टेस्ट क्रिकेटमधला तिसरा सर्वात मोठा विजय

By admin | Published: March 7, 2017 06:25 PM2017-03-07T18:25:38+5:302017-03-07T18:34:37+5:30

बंगळुरू कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत एक विक्रम आपल्या नावे केला.

Less than 200 goals, the third greatest victory in Test cricket | 200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य, टेस्ट क्रिकेटमधला तिसरा सर्वात मोठा विजय

200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य, टेस्ट क्रिकेटमधला तिसरा सर्वात मोठा विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - बंगळुरू कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत एक विक्रम आपल्या नावे केला. भारताने ऑस्ट्रेलियाला 188 धावांचं लक्ष्य दिलं होतं त्याचा पाठलाग करताना कांगारूंचा संघ 112 धावांमध्येच गारद झाला. म्हणजे 200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य देऊनही भारताने कांगारूंवर मात केली.
200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य देऊन विजय मिळवण्याच्या बाबतील भारताचा हा विजय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. याबाबतीत सर्वात मोठा विजय  वेस्ट इंडिजच्या नावावर आहे.  1994 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला 147 धावांनी हरवलं होतं. 
1994 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला 194 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र, त्याबदल्यात अख्खा इंग्लंडचा संघ केवळ 46 धावांमध्ये गारद झाला होता. 
त्यानंतर 1911 मध्ये मेलबर्न कसोटीत 170 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 80 धावांमध्ये ऑलआउट झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी जिंकला. 
भारताने छोटं लक्ष्य देऊन केव्हा केव्हा साजरा केला विजय- 
2004 - 107 चं टार्गेट,  ऑस्ट्रेलिया 93 धावांवर ऑलआउट
1981 - 143 चं टार्गेट, ऑस्ट्रेलिया 83 धावांवर ऑलआउट
1996 - 170 चं टार्गेट,  द. अफ्रीका 105 धावांवर ऑलआउट
1969 - 188 चं टार्गेट,  न्यूझीलंड 127 धावांवर ऑलआउट
पहिल्या डावात पिछाडीवर असताना भारताचा घरच्या मैदानावर विजय-
274 v ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001
99 v ऑस्ट्रेलिया, मुंबई, 2004
87 v ऑस्ट्रेलिया, बंगलुरु, 2017
 
  

Web Title: Less than 200 goals, the third greatest victory in Test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.