सीबीआय चौकशी लवकरात लवकर व्हावी - नरसिंह यादव

By admin | Published: August 20, 2016 07:01 PM2016-08-20T19:01:09+5:302016-08-20T19:07:23+5:30

मला अडकविण्यासाठी माझ्याविरोधात ज्यांनी कोणी हे कटकारस्थान रचले असेल त्यांची लवकरात लवकर सीबीआय चौकशी करावी अशी मागणी नरसिंह यादवने केली.

Let the CBI investigate as soon as possible - Narasimha Yadav | सीबीआय चौकशी लवकरात लवकर व्हावी - नरसिंह यादव

सीबीआय चौकशी लवकरात लवकर व्हावी - नरसिंह यादव

Next
style="text-align: justify;">शिवाजी गोरे 
रिओ दि जानेरो, दि. २० - भारतीय कुस्तीचे नुकसान झाले आहे. मला अडकविण्यासाठी माझ्याविरोधात ज्यांनी कोणी हे कटकारस्थान रचले असेल त्यांची लवकरात लवकर सीबीआय चौकशी करून ज्यांनी कोणी हे सर्व केले आहे त्यांना  त्यांना  शिक्षा व्हायलाच हवी. जर मी दोषी असेल तर मला शिक्षा करा असे, व्यक्तव्य कुस्तीपटू नरसिंह यादव  केले. क्रीडा लवादाने त्याच्यावर चार वर्षाची बंदी घेतल्यानंतर त्याने सकाळी ११ वाजताच गेम्स व्हिलेज सोडले होते. तेव्हापासून तो कोठे आहे हे कोणालाच  माहित नव्हते. आणि त्यातच बॅडमिंटनमध्ये सिंधूने रौप्यपदक जिंकल्यामुळे थोडा वेळ का होईना सर्वांना नरसिंहचा विसर पडला होता. पण, रात्री ८ वाजता त्याचा पत्ता लोकमतच्या प्रतिनिधीला लागला. त्याची रात्री एका  मोठ्या पंचतारांकीत सोसायटीत उशिरा प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्याने  वरील  व्यक्तव्य केले. 
नरसिंह म्हणाला, कोट्यावधी भारतीयांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही याचा मला खेद आहे. या षडयंत्राच्या मागे कोण आहे याचा हरियाणा पोलिसांनी तपास करून जो काणी असेल त्याला जबर शिक्षा व्हयलाच हवी. जर त्यांना असेच सोडून दिले तर असे प्रकार पुढे वारंवार होत राहतील आणि कोणीही खेळाडू कुस्तीकडे वळणार  नाही आणि भारतातील कुस्ती संपून जाईल. जर त्यात मी दोषी असेल तर मला सुध्दा शिक्षा करावी. माझ्या बरोबर सराव करणाºया मल्लाची मी नावासह एवढी माहिती दिली असताना सुध्दा पोलिस त्याला अजून कसे शोधून काढू शकत नाही म्हणजे यात काही तरी काळेबेरे नक्कीच आहे. मला रियो आॅलिम्किमध्ये सहभागी होऊन द्यायचे नाही यासाठी हे मोठे कटकारस्थान रचले गेले आहे.  तो काही कोठे परदेशात पळून गेलेला आहे का? मग त्याचा शोध पोलिसांना का लागत नाही? त्याच्या मागे कोण आहे आणि त्याने हे कोणाच्या सांगण्यावरून केलेले आहे याचा सोक्षमोक्ष व्हायलाच पाहिजे.  
त्या मुलाने तुझ्या जेवणात उत्तेजक द्रव्या टाकले आहे हे तुला कसे कळाले ? 
त्या मुलाने जेव्हा माझ्या जेवनात ते टाकले तेव्हा माझ्या इतर मित्रांनी आणि माझे जेवन जो करतो त्याने सुध्दा त्याला पाहिले होत. नाडा समोर सुध्दा त्याची साक्ष झाली होती. पण तो आता पोलिसांना सापडत नाही असे पोलिस सांगत आहेत. असे कसे होऊ  शकते. तो काय धुमकेतू आहे का ? का पोलिस सुध्दा त्यांना सामिल आहेत ? 
जेव्हा क्रीडा लवादाची चौकशी सुरु होती तेव्हा तुला अपेक्षा होती का तुझ्या बाजूने निर्णय लागेल ?  
हो मला पूर्ण का खात्री होती. माझे वजन होऊन भाग्यपत्रिकेत नाव सुध्दा आले होते. पण निर्णय वेगळाच लागला. भारतात न्यायालयासमोर मी त्या मल्लाचे नाव सुध्दा सांगितले होते. त्याच्या पासपोर्टची कॉपी सुध्दा प्पोलिसांना दिली होती. एफआयआरमध्ये त्याचे नाव सुध्दा आले आहे. क्रीडा लवादाचे म्हणणे असे होते की, जर हे सर्व झाले आहे तर त्याला समोर उभे करा. पण तो पोलिसांना अजून सापडेलाच नाही. त्यामुळे येथे कसलाच पुरावा सादर करता आला नाही.
 तुझ्या गटातील आज ज्या लढती झाल्या आणि ज्यांनी पदके जिंकले त्यांच्या बरोबर तु खेळला होतास का आणि त्यांना तू  पराभूत केले होते का?  त्यावर नरसिंह म्हणाला, ज्या मल्लांनी कास्यपदके जिंकली आहेत त्या दोघांनाही मी पराभूत केलेले आहे. प्रत्येक खेलाडूचे स्वप्न असते की आॅलिम्पिकमध्ये खेळून आपल्या देशासाठी पदक जिंकावे. ते माझा स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. माझ्या नावापुढे कलंक लागला आहे  तो लवकरात लवकर धुतला जावा, त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी लवकरात लवकर होऊन माझ्यावरील बंदी हटविली जावी. जर तो मुलागा पोलिसांनी पकडला असता आणि त्याच्याकडून सत्य बाहेर काढले असते तर मी आज खेळू शकलो असतो आणि नक्कीच पदक जिंकले असते.   
येथे आल्यावर घरच्यांबरोबर काही बोलणे झाले का ? असे विचारले असता तो म्हणाला, एकदा बोलणे झाले, ते खूप काळजीत आहेत. क्रीडा लवादाचा निर्णय माझ्याविरोधात गेल्यामुळे ते खूप दु:खी आहेत. मी सुध्दा त्यांच्या बरोबर व्यवस्थित बोलू शकलेलो नाही. त्यांना माझ्यावर विश्वास होता की मी नक्की पदक जिंकले. 
 
प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते  आॅलिम्पिकमध्ये खेळून  आपल्या देशासाठी पदक जिंकावे, पण हे माझे स्वप्न माझ्याविरूध्द कटकारस्थान रचल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. भगवान के घर देर है अंधेर नही..सीबीआय चौकशी जर योग्य पध्दतीने लवकर झाली तर सत्य सर्वांसमोर येईल. माझ्यावरील जो खोटा कलंक लागला गेला आहे तोो सुध्दा धुतला जाईल आणि माझ्यावरील बंदी उठविली जाईल. आणि   मला आपल्या देशासाठी खेळता येईल आणि पदके जिंकता येतील. 
 -- नरसिंह यादव 

Web Title: Let the CBI investigate as soon as possible - Narasimha Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.