नव्या मोसमाची विजयी सुरुवात करू
By admin | Published: September 20, 2016 05:20 AM2016-09-20T05:20:30+5:302016-09-20T05:20:30+5:30
न्यूझीलंड संघाच्या फिरकी आणि डावखुऱ्या गोलंदाजांचा व्हिडिओ पाहून आम्ही रणनीती आखली आहे.
कानपूर : ‘‘किवी संघाला कोणत्याही प्रकारे गृहीत धरणार नसून त्यांच्याविरुद्ध पूर्ण क्षमतेनेच खेळणार. न्यूझीलंड संघाच्या फिरकी आणि डावखुऱ्या गोलंदाजांचा व्हिडिओ पाहून आम्ही रणनीती आखली आहे. तसेच, नव्या मोसमाची सुरुवात ग्रीन पार्क येथे विजयाने करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला.
ग्रीन पार्क येथे होणारा मालिकेतील पहिला सामना भारतीय क्रिकेट इतिहासातील ५००वा कसोटी सामना ठरणार असल्याने, या
सामन्यात खेळण्याची संधी मिळत असल्याबद्दल रहाणेने स्वत:ला नशीबवान म्हटले. ग्रीन पार्कविषयी रहाणे म्हणाला, ‘‘येथे मी यापूर्वी अनेकदा खेळलो असून, ही खेळपट्टी अधिकाधिक हळुवार होत आहे. त्यामुळेच पहिल्या दिवशी येथे आमचा संघ कसा खेळतो
आणि प्रमुख खेळाडूंची कामगिरी कशी होते हे खूप महत्त्वाचे ठरेल.’’
न्यूझीलंड संघाविषयी
रहाणे म्हणाला, ‘‘त्यांचे फिरकी
आणि डावखुरे गोलंदाज चांगले
असून आम्ही त्यांचा आदर करतो. अनेक गोलंदाजांविरुद्ध पहिल्यांदाच खेळणार असल्याने आम्ही त्यांचा व्हिडिओ पाहून रणनीती आखत आहोत. तसेच, डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध खेळण्याचा
सरावही करीत आहोत.
किवी संघाविरुद्ध खास योजना आखल्या असून मैदानावर त्या
दिसून येतील.’’ (वृत्तसंस्था)
>नव्या मोसमातील हा पहिलाच सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नुकताच झालेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास उंचावलेला असून, प्रत्येक खेळाडू चमकदार कामगिरी करण्यास आतुर आहे. मात्र, तरीही न्यूझीलंडला आम्ही कमी लेखत नाही.
- अजिंक्य रहाणे