हरभजन सिंगने लिहिले कुंबळेला पत्र

By admin | Published: May 18, 2017 03:57 AM2017-05-18T03:57:28+5:302017-05-18T03:57:28+5:30

राष्ट्रीय संघातून बाहेर राहिल्यानंतर हरभजन सिंग याला स्थानिक क्रिकेटचा अंदाज घेण्याची संधी मिळाली. त्याने रणजीपटूंचा आर्थिक संघर्ष पाहिला.

Letter from Kumble for Harbhajan Singh wrote | हरभजन सिंगने लिहिले कुंबळेला पत्र

हरभजन सिंगने लिहिले कुंबळेला पत्र

Next

नवी दिल्ली : राष्ट्रीय संघातून बाहेर राहिल्यानंतर हरभजन सिंग याला स्थानिक क्रिकेटचा अंदाज घेण्याची संधी मिळाली. त्याने रणजीपटूंचा आर्थिक संघर्ष पाहिला. त्यानंतर त्याने मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याकडे विनंती केली आहे की, त्यांनी सीओएकडे सामना फी वाढविण्याचा विषय सादर करावा. २१ मे रोजी कुंबळे प्रशासकीय समितीपुढे ‘प्रझेंटेशेन’ देणार आहेत. ज्यात करारबद्ध भारतीय क्रिकेटपटूंच्या मानधनाचा विषय असेल.
भारताचे आघाडीचे क्रिकेटपटू तसेच आयपीएलशी करारबद्ध काही प्रथम श्रेणी क्रिकेटपटू यांच्यासोबत स्थानिक क्रिकेटपटूंना प्रथम श्रेणी सामना (रणजी किंवा दुलीप चषक) खेळल्यानंतर दीड लाख रुपये मिळत होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना एक कसोटी सामना खेळल्यास १५ लाख रुपये मिळतात. हरभजनने या विषयाकडे लक्ष केंद्रित
केले असून, त्याने आपल्या पत्रात
म्हटले आहे, की गेल्या दोन वर्षांपासून
मी रणजी क्रिकेट खेळत आहे. मी
प्रथम श्रेणी क्रिकेटपटंूना आर्थिक
संघर्ष करताना पाहिले आहे.
रणजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड
करीत आहे. मी एक खेळाडू या नात्याने आपणास विनंती करतो की रणजीपटूंसाठी आपण प्रेरणास्रोत तसेच रोलमॉडेल आहात. (वृत्तसंस्था)

बोर्डाने बड्या अधिकारी आणि सचिन, राहुल, लक्ष्मण व वीरू यासारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबत चर्चा करावी. बऱ्याच काळापासून रणजी मानधनाच्या रचनेत बदल झालेला नाही. यामध्ये बदलाची गरज आहे. त्यासाठी मीसुद्धा मदत करण्यास तयार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २००४ पासून मानधन रचनेत बदल झालेला नाही. सर्वच खेळाडूंना आयपीएलचा करार मिळत नाही. त्यांचाही विचार व्हायला हवा. जर मी गेल्या चार-पाच वर्षांत स्थानिक क्रिकेट खेळलो नसतो तर ही बाब माझ्या लक्षात आली नसती, असेही हरभजनने म्हटले आहे.

Web Title: Letter from Kumble for Harbhajan Singh wrote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.