फुटबॉलमध्ये आयुष्य फार क्षणिक असते

By Admin | Published: November 27, 2014 12:46 AM2014-11-27T00:46:13+5:302014-11-27T00:46:13+5:30

भूतकाळ हा घडून गेलेला असतो. तो कितीही चांगला असला तरी परत येत नाही.खरं तर फुटबॉलमध्ये आयुष्य फार क्षणिक असते.

Life in football is very momentary | फुटबॉलमध्ये आयुष्य फार क्षणिक असते

फुटबॉलमध्ये आयुष्य फार क्षणिक असते

googlenewsNext
पीटर रीड 
भूतकाळ हा घडून गेलेला असतो. तो कितीही चांगला असला तरी परत येत नाही.खरं तर फुटबॉलमध्ये आयुष्य फार क्षणिक असते. दिल्ली डायनॅमोज् एफसीकडेच बघा ना! कालपयर्ंत बहुतेकांनी त्यांना बाद ठरवले होते पण आता त्यांचा आत्मविश्वास विशेषत: नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी विरुद्धच्या विजयाने दुणावला आहे. दिल्लीकरता हा फार चांगला निकाल होता. सामन्याच्या किक ऑफच्या आधी मला कुणी विचारले असते तर खरं म्हणजे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचे पारडे जड वाटत होते. पण दिल्ली डायनॅमोज्चे गुस्ताव सँटोस आणि हॅन्स मडलर अचूक होते आणि आता आमच्या विरुद्धही ते आक्रमक खेळतील. 
चेन्नई एफ सी सारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या पराभवातून आम्ही आता सावरले आहोत तरीही आम्ही आमचे उत्तम खेळाडू खेळवण्यास असमर्थ आहोत. आमचे दोन महत्त्वाचे खेळाडू, आंद्रे मॉरीट्झ आणि निकोलस अनेल्का दिल्ली डायनॅमोज् एफसी विरुद्धच्या पुढच्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. आमच्या बरोबर ते दिल्लीला असणार नाहीत हि नक्कीच चांगली बातमी नाही. 
यामुळे फ्रेडी जुंगबर्गला सुरवातीपासून खेळावे लागेल. त्याच्या मैदानावरच्या असण्याने संतुलन साधले तर जातेच पण सर्वांना उर्जा मिळते. गेल्या सामन्यात तो सुमारे तासभर खेळला. त्याचे मैदानावर असणो हा नक्कीच बोनस आहे.
आम्हाला सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल आणि आमचा तसा आहेच. खेळाडूंनी मैदानावर झोकून देऊन बहारदार खेळ करणो हि काळाची गरज आहे. आम्ही आत्तापयर्ंत घराबाहेरचा सामना जिंकलेला नाही पण याचा अर्थ जिंकणारच नाही असे नाही. आशा करूया सरासरीचा नियम आम्हाला लागू पडेल
पण मी परत सांगतो कि आमच्याकरता हा कठीण सामना आहे. माङयामते हा विजय आमच्या आवाक्यात आहे आणि हीच आमची प्रेरणा असेल कारण त्याने आम्हाला उपांत्य फेरीचे दरवाजे खुले होतील. दिल्लीविरुद्ध आम्हाला चेंडू पास देत खोलवर त्यांच्या गोलमध्ये नेऊन मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करावे लागेल. काय गंमत आहे! ना कुणी काही या खेळाबद्दल भविष्य वर्तवू शकते ना काही गृहीत धरू शकते.  
दिल्लीची सध्याची थंडी भारतीय खेळाडूंना परिचित आहे तर परदेशी खेळाडूंना सुखावह ठरणार आहे. भारतातले एकूणच ठिकठीकाणचे हवामान इतके भिन्न आहे कि सलग पूर्ण वेळ जलद फुटबॉल खेळणो आव्हानात्मक आहे. आशा करूया दिल्लीतील संध्याकाळ उत्तम फुटबॉलचे प्रदर्शन करायला उत्सुक असलेल्या दोन्ही संघाकरता सुखावह असेल. थंडीत मी मात्र माझा ‘बंडाना’ घालून असेन हे नक्की! (टीसीएम)

 

Web Title: Life in football is very momentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.