लिन, गंभीरचे तुफान! गुजरातची दाणादाण

By admin | Published: April 7, 2017 09:41 PM2017-04-07T21:41:42+5:302017-04-07T23:11:21+5:30

ख्रिस लिन आणि कर्णधार गौतम गंभीरने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइटरायडर्सने आयपीएलमधील

Lin, severe storm! Gujarat riots | लिन, गंभीरचे तुफान! गुजरातची दाणादाण

लिन, गंभीरचे तुफान! गुजरातची दाणादाण

Next
> ऑनलाइन  लोकमत 
राजकोट, दि 7 - ख्रिस लिन आणि कर्णधार गौतम गंभीरने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइटरायडर्सने आयपीएलमधील तिसऱ्या लढतीत गुजरात लायन्सचा धुव्वा उडवला. 41 चेंडूत 93 धावांची तुफानी खेळी करणारा लीन आणि 48 चेंडूत 76 धावा फटकावणाऱ्या गंभीरने अभेद्य 184 धावांची भागीदारी करत कोलकात्याला दहा गडी राखून विजय मिळवून दिला.  
आयपीएलमधील आज सुरू असलेल्या  तिसऱ्या लढतीत गुजरात लायन्सने कोलकाता नाइटरायडर्ससमोर 184 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान  गौतम गंभीर आणि ख्रिस लीनच्या तुफानामध्ये पाल्यापाचोळ्यासारखे उडून गेले. गंभीर आणि लीनने तुफानी फटकेबाजी करत पाचव्या षटकात संघाचे अर्धशतक आणि आठव्या षटकात शतक फलकावर लावले. दरम्यान, त्यांनी आपापली अर्धशतकेही पूर्ण केली. 
ही जोडी मैदानात उभी राहिल्यावर गुजरातच्या गोलंदाजांनी त्यांच्यासमोर गुडघे टेकले. अखेर  लीन आणि गंभीरने 15 व्या षटकातच कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
कोलकाता नाइटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर कर्णधार सुरेश रैनाने केलेली अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकात दिनेश  कार्तिकने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने 20 षटकात 4 बाद 183 धावा फटकावल्या.  ब्रेंडन मॅक्युलमने गुजरातला आक्रमक सुरुवात करून दिली. पण जेसन रॉय (14), मॅक्युलम (35) आणि आरोन फिंच (15) हे ठरावीक अंतराने बाद झाले. त्यामुळे 11 व्या षटकात गुजरातची अवस्था 3 बाद 92 अशी झाली होती. मात्र अशा परिस्थितीत कर्णधार सुरेश रैना (नाबाद 68) आणि दिनेश कार्तिक (47) यांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावा जोडत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.  

Web Title: Lin, severe storm! Gujarat riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.