Lionel Messi FIFA World Cup 2022: लियोनल मेस्सीचा अर्जेंटिना संघच होणार 'वर्ल्ड चॅम्पियन'? 'हे' २ अजब योगायोग देताहेत विशेष संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 02:12 PM2022-12-15T14:12:14+5:302022-12-15T14:12:56+5:30

अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स रविवारी रंगणार फुटबॉलचा महामुकाबला

Lionel Messi Argentina strange coincidence to win fifa world cup 2022 final football wc club psg penalty kick | Lionel Messi FIFA World Cup 2022: लियोनल मेस्सीचा अर्जेंटिना संघच होणार 'वर्ल्ड चॅम्पियन'? 'हे' २ अजब योगायोग देताहेत विशेष संकेत

Lionel Messi FIFA World Cup 2022: लियोनल मेस्सीचा अर्जेंटिना संघच होणार 'वर्ल्ड चॅम्पियन'? 'हे' २ अजब योगायोग देताहेत विशेष संकेत

googlenewsNext

Lionel Messi Football World Cup: कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA World Cup 2022 मध्ये लिओनेल मेस्सीची जादू साऱ्यांनाच दिसून येत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने अर्जेंटिनाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले आहे. आता मेस्सीचा संघ 'फुटबॉल वर्ल्ड चॅम्पियन' होण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. त्यांचा अंतिम सामना दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या फ्रान्सशी होणार आहे. अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता खेळवला जाणार आहे. पण त्याआधी मेस्सीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवण्याचा दावा करणाऱ्या मेस्सीशी संबंधित असे दोन अजब योगायोग  आहेत, जे त्याच्या संघाला पुन्हा एका विश्वविजेता बनवू शकतात.

एक योगायोग ग्रुप स्टेज सामन्यांच्या दरम्यान समजला होता. पण एक योगायोग आता घडला आहे. मेस्सीचा क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) सोबत एक विचित्र योगायोग घडताना दिसला आहे. अर्जेंटिनाने अंतिम फेरी गाठल्याने हा योगायोग अधिकच पक्का होताना दिसत आहे.

पहिला अजब योगायोग

या विश्वचषक स्पर्धेतील क गटातील शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडचा २-० असा पराभव केला. या तिसर्‍या सामन्यात लिओनेल मेस्सीला पेनल्टीची संधी मिळाली, पण त्याला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. मेस्सी हा जगातील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, तो त्याच्या संघातील सर्वात अनुभवी आणि स्टार खेळाडू आहे. असाच काहीसा प्रकार अर्जेंटिनाच्या बाबतीत १९७८ आणि १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत घडला होता. त्यावेळी अर्जेंटिनाच्या तिसऱ्या सामन्यात मारियो केम्पेस (१९७८) आणि दिएगो मॅराडोना (१९८६) या दोन स्टार खेळाडूंनीही पेनल्टी चुकवली होती. पण या दोनही वर्षी अर्जेंटिना विश्वविजेता बनला होता. आता यावेळी मेस्सीनेही पेनल्टीवर गोल मिस केल्याने हा योगायोग घडावा असे साऱ्यांनाच वाटत आहे.

दुसरा अजब योगायोग

फ्रान्सच्या पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) शी संबंधित हा अजब योगायोग २१ व्या शतकापासून सुरू झाला आहे. सर्वप्रथम, ब्राझीलचा अनुभवी खेळाडू रोनाल्डिन्हो २००१ मध्ये या PSG क्लबमध्ये सामील झाला. पुढच्याच वर्षी म्हणजे २००२ मध्ये त्याने ब्राझीलला विश्वचषक जिंकून दिला. रोनाल्डिन्हो नंतर, फ्रान्सचा कायलिन एम्बाप्पे २०१७ मध्ये PSG मध्ये सामील झाला. पुढच्याच वर्षी २०१८ मध्ये त्याने आपल्या फ्रान्स संघाला विजेतेपद मिळवून दिले. असाच योगायोग मेस्सीच्या बाबतीत घडत आहे. मेस्सी २०२१ मध्ये PSG क्लबमध्येही सामील झाला आहे आणि आता त्याचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. म्हणजेच हा योगायोगही मेस्सी जेतेपद पटकावू शकतो याचे पूर्ण संकेत देत आहे.

Web Title: Lionel Messi Argentina strange coincidence to win fifa world cup 2022 final football wc club psg penalty kick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.