Messi Maradona: मानलं भावा... लिओनल मेस्सीने केली कमाल, मोडला दिग्गज मॅराडोनाचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 10:00 AM2022-12-01T10:00:42+5:302022-12-01T10:01:34+5:30
Lionel Messi Diego Maradona, Argentina: अर्जेंटिनाने विजयासह बाद फेरीत मारली धडक
Lionel Messi Diego Maradona, Argentina: FIFA World Cup 2022 च्या C गटाच्या सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडचा पराभव केला. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने हा सामना २-० असा जिंकला. या सामन्यात मेस्सीने दिग्गज फुटबॉलपटू मॅराडोनाचा विक्रम मोडला. त्याच वेळी पोलंडलाही अर्जेंटिनाकडून पराभवाचा फायदा झाला. मॅराडोनाचा विक्रम मोडण्यासाठी मेस्सीला काहीही विशेष करण्याची गरज नव्हती. मैदानात उतरताच त्याने मॅराडोनाला मागे सोडले. कारण अर्जेंटिनासाठी फिफा विश्वचषकात सर्वाधिक २२ सामने खेळणारा मेस्सी पहिला खेळाडू ठरला. मॅराडोनाने वर्ल्ड कपमध्ये २१ सामन्यात अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले होते.
#FIFAWorldCup स्पर्धेत अर्जेंटिनाकडून सर्वाधिक २१ सामने खेळण्याचा मॅरेडोनाचा विक्रम आज लिओनेल मेस्सीने तोडला. पोलंड विरुद्धच्या सामन्यात मेस्सीने २८व्या मिनिटाला गोल केलाच होता, परंतु गोलीने चयुराईने तो अडवला. #Argentina#Polandpic.twitter.com/T3CoeLIoYi
— Swadesh Ghanekar (@swadeshLokmat) November 30, 2022
कतारच्या मैदानात दोन्ही संघांमध्ये आक्रमक फुटबॉल पाहायला मिळाला. अर्जेंटिनाने सुरुवातीपासूनच पोलंडच्या गोलपोस्टवर आक्रमणे सुरूच ठेवली. पूर्वार्धात त्यांनी किमान ६ वेळा आक्रमण केले पण पोलंडच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. सामन्याच्या ३८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टीही मिळाली. पण मेस्सीला त्याचं सोनं करता आलं नाही. त्याची किक पोलंडच्या डायव्हिंग गोलकीपरने वाचवली. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत राहिला.
The Argentina dream lives on 🇦🇷#FIFAWorldCup#Qatar2022pic.twitter.com/j1bcuTv70H
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 30, 2022
मात्र दुसरा हाफ सुरू होताच अर्जेंटिनाने पोलंडविरूद्ध पहिला गोल केला. सामन्याच्या ४६व्या मिनिटाला अॅलेक्सिस अॅलिस्टरने अर्जेंटिनासाठी गोल केला. सामन्यात ०-१ ने पिछाडीवर असलेल्या पोलंडनेही गोलशून्य बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रयत्नात त्याने आणखी एक गोल दिला. सामन्याच्या ६७व्या मिनिटाला अल्वारेझने गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मात्र सामन्यात एकही गोल होऊ शकला नाही. अर्जेंटिनाने सामना जिंकला. आता अर्जेंटिनाची बाद फेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.