लायन्स-सनरायजर्ससाठी ‘करा किंवा मरा’ लढत

By admin | Published: May 13, 2017 02:03 AM2017-05-13T02:03:55+5:302017-05-13T02:03:55+5:30

गत चॅम्पियन सनरायजर्स आणि खराब फॉर्मचा सामना करीत असलेला गुजरात लायन्स संघ आयपीएल-१० मध्ये आज शनिवारी ‘करा किंवा मरा’

Lions-Sunrisers fight 'Make or Die' | लायन्स-सनरायजर्ससाठी ‘करा किंवा मरा’ लढत

लायन्स-सनरायजर्ससाठी ‘करा किंवा मरा’ लढत

Next

कानपूर : गत चॅम्पियन सनरायजर्स आणि खराब फॉर्मचा सामना करीत असलेला गुजरात लायन्स संघ आयपीएल-१० मध्ये आज शनिवारी ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह उतरणार आहेत.
दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध पराभूत झालेल्या सनरायजर्सने मुंबईला सात गड्यांनी नमविले होते. डेव्हिड वॉर्नरच्या या संघाला आज या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. १३ सामन्यात सात विजयासह सनरायजर्सचे १५ गुण असून, संघ चौथ्या स्थानावर आहे. लायन्सचे १३ सामन्यात केवळ आठ गुण असल्याने हा संघ प्ले आॅफबाहेर पडला. सनरायजर्सने सामना गमविला तर प्ले आॅफसाठी रविवारी होणाऱ्या पुणे- पंजाब यांच्यातील सामन्यावर विसंबून रहावे लागेल. पुणे संघाने पंजाबला धूळ चारली तरच हैदराबाद बाद फेरीसाठी पात्र होईल.
सनरायजर्सकडे सर्वांत संतुलित संघ आहे. वॉर्नरकडे ‘आॅरेंज’ तर भुवनेश्वरकडे ‘पर्पल’ कॅप आहे. फलंदाजीत वॉर्नर आणि शिखर धवन यांच्या क्रमश: ५३५ आणि ४५० धावा आहेत. भुवनेश्वरने २३ गडी बाद केले. सिद्धार्थ कौलचे १५ आणि राशीद खानचे १४ बळी आहेत. दुसरीकडे गुजरातच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. कर्णधार सुरेश रैनाने आतापर्यंत ४४० धावा केल्या. मागच्या सामन्यात अ‍ॅरोन फिंच आणि दिनेश कार्तिक यांनी त्याला साथ दिली.
गोलंदाजी रैनासाठी चिंतेची बाब ठरली. या संघाचे गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरले. जखमी होऊन बाहेर पडलेला अ‍ॅन्ड्र्यू टाये याची संघाला उणीव जाणवत आहे. जेम्स फॉल्कनर तसेच रवींद्र जडेजा हे देखील पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Lions-Sunrisers fight 'Make or Die'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.