चॅलेंजर्सविरुद्ध लायन्सची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 03:56 AM2016-04-24T03:56:04+5:302016-04-24T03:56:04+5:30
पहिल्या तिन्ही सामन्यांत ओळीने विजय साजरे केल्यानंतर चौथ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहणाऱ्या गुजरात लायन्सला आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध विजयी पथावर परतण्याचे
राजकोट : पहिल्या तिन्ही सामन्यांत ओळीने विजय साजरे केल्यानंतर चौथ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहणाऱ्या गुजरात लायन्सला आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध विजयी पथावर परतण्याचे आव्हान असेल. बंगळुरुला आक्रमक ख्रिस गेल याची उणीव जाणवणार आहे.
गुजरातने किंग्ज इलेव्हन पंजाब, रायझिंग पुणे आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर गुजरातला सनरायझर्स हैदराबादकडून दहा गड्यांनी पराभवाचा धक्का बसला होता. आरसीबीविरुद्ध हा संघ कमकुवत गोलंदाजी व गेलच्या अनुपस्थितीचा लाभ घेत विजयासाठी प्रयत्न करणार आहे. लायन्सची फलंदाजी सलामीवीर अॅरॉन फिंच आणि ब्रँडन मॅक्युलम, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो आणि दिनेश कार्तिक यांच्या कामगिरीवर विसंबून असेल. ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा यांच्याकडूनही बऱ्याच आशा आहेत. गोलंदाजीत हा संघ डेल स्टेनऐवजी जेम्स फॉल्कनरला संधी देऊ शकतो. आरसीबीने मागच्या सामन्यात धोनीच्या पुणे संघाला नमविले होते. कोहली आणि डिव्हिलियर्स जबर फॉर्ममध्ये असल्याने त्यांच्या खेळावर निकाल अवलंबून असेल. आरसीबीची चिंता त्यांचा गोलंदाजी मारा हाच आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाचा मारा कुचकामी ठरला होता. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात लायन्स सुरेश रैना (कर्णधार), सरबजित लढ्ढा, अक्षदीप नाथ, ड्वेन ब्राव्हो, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी, जेम्स फॉल्कनर, अॅरॉन फिंच, ईशान किशन, रवींद्र जडेजा, शादाब जकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, ब्रँडन मॅक्युलम, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे आणि अॅन्ड्रयू टाये.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली (कर्णधार), वरुण अॅरॉन, अबू नेचीम, एस. अरविंद, सॅम्युअल बद्री, स्टुअर्ट बिन्नी, यजुवेंद्र चहल, एबी डीव्हिलियर्स, प्रवीण दुबे, ख्रिस गेल, ट्रॅव्हिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सर्फराज खान, विक्रमजित मलिक, मनदीपसिंग, अॅडम मिल्ने, हर्षल पटेल, लोकेश राहुल, परवेझ रसूल, केन रिचर्डसन, सचिन बेबी, मिशेल स्टार्क, विकास टोकस, शेन वॉटसन, डेव्हिड वीस, तबरेज शम्सी.