झंझावाती शतकासह केदार दिग्गज फलंदाजांच्या यादीत

By admin | Published: January 15, 2017 11:10 PM2017-01-15T23:10:16+5:302017-01-16T12:38:05+5:30

पुणेकर केदार जाधवने आज घरच्या मैदानावर केलेली शतकी खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली

In the list of Kedar giants with a thunderous century | झंझावाती शतकासह केदार दिग्गज फलंदाजांच्या यादीत

झंझावाती शतकासह केदार दिग्गज फलंदाजांच्या यादीत

Next
>ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 15 - पुणेकर केदार जाधवने आज घरच्या मैदानावर केलेली शतकी खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली, या खेळीमुळेच इंग्लंडकडे झुकत चाललेले सामन्याचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने सरकले. या खेळीसाठी केदारला सामनावीराच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 120 धावांची खेळी करणाऱ्या केदारने  अवघ्या 65 चेंडूतच शतकाला गवसणी घातली. त्याबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये  वेगवान शतक फटकावण्याचा विक्रम करणाऱ्या मोजक्या भारतीय फलंदाजांच्या यादीत केदारने स्थान मिळवले. 
केदारने 65 चेंडूत फटकावलेले शतक हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठल्याही भारतीय फलंदाजाने फटकावलेले सहावे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. त्याआधी विराट कोहली 52 चेंडूत, वीरेंद्र सेहवाग 60 चेंडूत आणि विराट कोहली 61 चेंडूत मोहम्मद अझरुद्दीनने 62 चेंडूत आणि युवराज सिंगने 64 चेंडूत शतक फटकावण्याची किमया केली होती.  

Web Title: In the list of Kedar giants with a thunderous century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.