Live - पाच षटकात इंग्लंडचे तीन गडी बाद
By admin | Published: April 3, 2016 06:37 PM2016-04-03T18:37:15+5:302016-04-03T19:25:27+5:30
वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरु झाला आहे. पहिल्या पाच षटकातच इंग्लंडला तीन धक्के बसले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ३ - वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरु झाला आहे. पहिल्या पाच षटकातच इंग्लंडला तीन धक्के बसले आहेत. पाच षटकात इंग्लंडच्या तीन बाद २३ धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर शून्यावर इंग्लंडला पहिला धक्का बसला.
सलामीवीर रॉयच्या बद्रीने शून्यावर यष्टया वाकवल्या. उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रॉय इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता.
त्यानंतर हेल्सला एका धावेवर रसेलने बद्रीकरवी झेलबाद केले. कर्णधार मॉर्गनला ५ धावांवर बद्रीने गेलकरवी झेलबाद केले. आता रुट आणि बटलरची जोडी मैदानावर आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सॅमीने सलग दहाव्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे.
दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी उपांत्यफेरीतील विजेता संघ कायम ठेवला आहे. इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला सात गड्यांनी धूळ चारली. वेस्ट इंडिजने दुसऱ्या उपांत्य सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सात गड्यांनी पराभूत केले.
भारताविरुद्ध लकी ठरलेल्या लेंडल सिमन्सकडून विंडीजला अंतिम सामन्यातही कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.