महामुकाबला LIVE: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, पराभवाच्या छायेत

By admin | Published: June 18, 2017 07:21 PM2017-06-18T19:21:14+5:302017-06-18T20:57:46+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब

LIVE: Indian batsmen lose, losing streak | महामुकाबला LIVE: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, पराभवाच्या छायेत

महामुकाबला LIVE: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, पराभवाच्या छायेत

Next
>ऑनलाइन लोकमत
ओव्हल, दि. 18 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारतीय फलंदाजीचं अक्षरशः कंबरडं मोडलं. त्याने पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज निराश केलं. वैयक्तिक दुस-या षटकात मोहम्मद आमिरने त्याला केवळ 5 धावांवर शादाब खानकरवी झेलबाद केलं. तर त्यानंतर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनलाही त्याने 21 धावांवर यष्टीरक्षक कर्णधार सरफराज अहमदकडे झेल देण्यास भाग पाडलं. भरवशाच्या युवराज आणि धोनीनेही आज सपशेल निराशा केली. अनुक्रमे 22 आणि 4 धावा काढून दोघं बाद झालं.
 
यापुर्वी बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना भारतासमोर 339 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर फखर जमानने झळकावलेल्या शानदार शतकाने पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.  फखरने 106 चेंडूत 114 धावा फटकावल्या. अखेर 34 व्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला रविंद्र जडेजाकरवी झेलबाद केलं.
 
 याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही षटकं भारतीय गोलंदाजांनी चांगली टाकली, ज्यात पाकिस्तानचे फलंदाज चाचपडताना दिसले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताकडून भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी केली मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. भुवनेश्वर, जाधव आणि पांड्या यांनी प्रत्येकी  एक गडी बाद केला तर एक फलंदाज धावचीत झाला.
 
 त्यापुर्वी फखर जमानसोबत सलामीसाठी आलेल्या अझहर अलीनेही महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.  दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतक झळकावत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली मात्र 23 व्या षटकात अर्धशतकवीर अझहर अली याला धावचीत करण्यात भारताला यश आलं. त्याने 71 चेंडूत 59 धावा काढल्या. याशिवाय पाकिस्तानकडून शोएब मलिकने 12 धावा  आणि बाबर आझमने 46 धावा केल्या. त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अर्धशतकवीर मोहोम्मद हाफिझ (57) आणि  इमाद वासिमने(25) झटपट फलंदाजी करत भारतीय संघासमोर 339 धावांचं आव्हान दिलं.
 

Web Title: LIVE: Indian batsmen lose, losing streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.