LIVE - विलियम्सन-लॅथमची अर्धशतके, न्यूझीलंड भक्कम स्थितीत

By admin | Published: September 23, 2016 09:48 AM2016-09-23T09:48:46+5:302016-09-23T17:09:53+5:30

सलामीवीर गुप्टील बाद झाल्यानंतर लॅटहॅम (४१) आणि विल्यमसन (४७) दोघांनी डाव सावरला असून, न्यूझीलंडने शतकाची वेस ओलांडली आहे.

LIVE - Williamson-Latham half-centuries, New Zealand strong position | LIVE - विलियम्सन-लॅथमची अर्धशतके, न्यूझीलंड भक्कम स्थितीत

LIVE - विलियम्सन-लॅथमची अर्धशतके, न्यूझीलंड भक्कम स्थितीत

Next

ऑनलाइन लोकमत 

कानपूर, दि. २३ - सलामीवीर गुप्टील बाद झाल्यानंतर लॅथम (५६) आणि विलियम्सन (६६) दोघांनी डाव सावरला असून, न्यूझीलंड दीडशे धावांच्या पुढे आहे. फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज वर्चस्व गाजवतील असा अंदाज आहे. पण सध्या तरी न्यूझीलंडचे फलंदाज समर्थपणे भारताची गोलंदाजी खेळून काढत आहेत. ३५ धावांवर गुप्टीलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. सलामीवीर गुप्टीलला (२१) उमेश यादवने पायचीत पकडले. दुस-या दिवसाचा खेळा पावसामुळे थांबवण्यात आला असून न्यूझीलंडच्या 47 षटकात एक बाद 152 धावा झाल्या आहेत.
 
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी भारताचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव या शेवटच्या जोडीने आणखी २७ धावांची भर घातली.  पहिल्या दिवशी भारताच्या ९ बाद २९१ धावा झाल्या होत्या. 
 
रविंद्र जाडेजा (४२) धावांवर नाबाद राहिला. उमेश यादवला वॅगनरने वॅटलिंगकरवी झेलबाद केले. त्याने वयैक्तिक ९ धावा केल्या. न्यूझीलंडची गुप्टील आणि लॅथहॅम ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर ही धावसंख्या पुरेशी मानली जात आहे.
 
मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे एकवेळ भक्कम स्थितीत असलेली भारतीय फलंदाजी न्यूझीलंडच्या फिरकी जाळ्यात अलगद अडकताच ऐतिहासिक ५०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर गुरुवारी ९ बाद २९१ अशी स्थिती झाली. ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर फिरकीला साथ मिळत असल्याने भारताच्या या धावा तशा पुरेशा मानल्या जात आहेत. 

Web Title: LIVE - Williamson-Latham half-centuries, New Zealand strong position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.