लोढा समिती वेळच देत नाही : ठाकूर
By admin | Published: December 22, 2016 12:25 AM2016-12-22T00:25:56+5:302016-12-22T00:25:56+5:30
बीसीसीआयने न्या. आर. एन. लोढा पॅनलने सुचविलेल्या ८० टक्के शिफारशी लागू केल्या आहेत. तीन-चार शिफारशींवर चर्चा करण्यासाठी
जयपूर : बीसीसीआयने न्या. आर. एन. लोढा पॅनलने सुचविलेल्या ८० टक्के शिफारशी लागू केल्या आहेत. तीन-चार शिफारशींवर चर्चा करण्यासाठी समिती २ महिन्यांपासून भेटीची वेळच देत नसल्याची तक्रार बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केली.
राजस्थान विद्यापीठाच्या विधी कॉलेजच्या विद्यार्थी सोहळ्यात बोलताना ठाकूर म्हणाले, ‘बीसीसीआयने लोढा समितीच्या ८० टक्के शिफारशी तंतोतंत लागू केल्या. तीन-चार शिफारशी लागू करणे शक्य नाही. यावर चर्चा करण्यासाठी समितीने पॅनलकडे वेळ मागितला. पॅनल दोन महिन्यांपासून आम्हाला वेळ देत नाही, अशी स्थिती आहे.’ बीसीसीआयने भूतकाळात शानदार काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)
विराट कोहली याला वन-डे संघाचा कर्णधार करण्याची मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली. यावर ठाकूर म्हणाले, ‘भारताचे वैशिष्ट्य असे की ज्या व्यक्तीने कधी क्रिकेट खेळले नाही अशी व्यक्ती कुणा एकाला कर्णधार बनविण्याची मागणी करते. कुणी क्रिकेटवर भाष्य करतो, तर कुणी बीसीसीआय त्यांच्या सल्ल्यानुसार चालविण्याची मागणी करतो.’