लोकेश राहुलने पदार्पणातच मोडला रेकॉर्ड, झिम्बाम्बेचा 9 विकेट्सनी पराभव
By admin | Published: June 11, 2016 08:38 PM2016-06-11T20:38:21+5:302016-06-11T21:03:02+5:30
लोकेश राहुलने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाम्बेचा 9 गडी राखत पराभव केला. झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करत 168 धावा केल्या होत्या
Next
>ऑनलाइन लोकमत -
हरारे, दि. 11 - झिम्बाबेविरोधात आपला पहिलाच एकदिवसीय सामना खेळणा-या लोकेश राहुलने पदार्पणातच शतक करत रेकॉर्ड केला आहे. लोकेश राहुलने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाम्बेचा 9 गडी राखत पराभव केला. झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करत 168 धावा केल्या होत्या. 169 धावांचा पाठलाग करणा-या भारताने 42.3 ओव्हर्समध्येच सामना जिंकला. तीन सामन्यांचा या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
लोकेश राहुल आणि अंबाती रायडूने दुस-या विकेटसाठी 38 ओव्हर्समध्ये 162 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलने जेव्हा 87 धावा केल्या तेव्हा त्याने पदापर्पणाच्या सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा रॉबिन उथ्थपाचा रेकॉर्ड तोडला. रॉबिन उथ्थपाने 2006 मध्ये इंग्लंडविरोधात इंदोरमध्ये खेळताना हा रेकॉर्ड केला होता.
कप्तान महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून जसप्रीत बुमराने 28 धावा देत चार विकेट्स घेतल्या तर धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरनने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
गोलंदाजांनी तोडला 10 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या 5 फलंदाजांना आऊट करत 30 ओव्हरमध्ये केवळ 91 धावा दिल्या. ही गोलंदाजी गेल्या 10 वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. भारतीय गोलंदाज गेल्या 10 वर्षात 30 ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 100 पेक्षा कमी धावांत रोखू शकले नव्हते. मात्र या युवा खेळाडूंनी हा अनोखा रेकॉर्ड केला आहे.