‘लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन’; लाल रंगाचा टी-शर्ट घालून तुम्ही धावू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 07:45 AM2020-08-29T07:45:11+5:302020-08-29T07:45:39+5:30

आरोग्याबाबत जागरूकता; उत्साहाचा, ऊर्जेचा, लोकमतचा

‘Lokmat Mahamarathon Virtual Red Run’; You can run wearing a red T-shirt | ‘लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन’; लाल रंगाचा टी-शर्ट घालून तुम्ही धावू शकता

‘लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन’; लाल रंगाचा टी-शर्ट घालून तुम्ही धावू शकता

Next

नागपूर : लोकमत समूहातर्फे दि. १४ जून रोजी झालेल्या ‘व्हर्च्युअल रन’ आणि दि. २ आॅगस्ट रोजी झालेल्या ‘व्हर्च्युअल फ्रीडम रन’ या दोन्ही स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातूनच फिटनेस प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धावपटूंचा उत्साह आणि आरोग्याविषयीची जागरूकता अशीच टिकवून ठेवण्यासाठी दि. ६ सप्टेंबर रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

साहस, ऊर्जा आणि उत्साह
06 रोजी स. ६ ते सायं. ७ या वेळेत ही स्पर्धा होईल. लाल रंग हा आवड, साहस आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळेच या स्पर्धेसाठी खास लाल रंगाची निवड करण्यात आली आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन’ या स्पर्धेत जेव्हा सर्व धावपटू लाल रंगाचा टी शर्ट घालून धावतील, तेव्हा तो लाल रंग त्यांची फिटनेसप्रती असणारी आवड, साहसाविषयीचे प्रेम आणि मॅरेथॉनसारख्या स्पर्धांसाठी लागणारी प्रचंड ऊर्जा दाखवून देईल.

सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. १० किमी, ५ किमी आणि ३ किमी या तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा होत आहे.

लोकमत महामॅरेथॉन वेबिनार

  • योग्य व्यायामाने दुखापती टाळणे व त्यांच्यावर मात करणे शक्य आहे.
  • मॅरेथॉन किंवा अन्य स्पर्धांमध्ये नियमित धावणाऱ्या धावपटूंसाठी जखमा, दुखापत होणे नवे नाही; पण दुखापत झाली म्हणून पळणे थांबले, असे होऊ देऊ नका.
  • योग्य व्यायाम आणि ताकद कशी वाढवायची याचे योग्य तंत्र आत्मसात केले, तर दुखापती टाळता येतील आणि दुखापतींवर मात सहज शक्य आहे, अशा शब्दांत डॉ. धनंजय मोरे यांनी धावपटूंना मार्गदर्शन केले.
  • शुक्रवारी सायंकाळी ‘लोकमत महामॅरेथॉन’ या फेसबुक पेजवर या महत्त्वपूर्ण वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.


लाल रंगाचा टी-शर्ट घालून तुम्ही धावू शकता
दि. ६ सप्टेंबर २0२0 रोजी,
सकाळी ६ ते सायं. ७ पर्यंत - ३, ५, १० किमी

रजिस्ट्रेशनसाठी लिंक - http://bit.ly/LMVREDRUN

Web Title: ‘Lokmat Mahamarathon Virtual Red Run’; You can run wearing a red T-shirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.