लोकमत एनपीएल क्रिकेट-१

By admin | Published: January 22, 2016 11:50 PM2016-01-22T23:50:14+5:302016-01-23T00:11:41+5:30

सामनावीर

Lokmat NPL Cricket-1 | लोकमत एनपीएल क्रिकेट-१

लोकमत एनपीएल क्रिकेट-१

Next

सामनावीर
फोटो क्रमांक २२ पीएचजेए७१
नाशिक सुपरकिंग्जचा धनंजय ठाकूर
लोकमत एनपीएल क्रिकेटमध्ये नाशिक सुपरकिंग्जचा धनंजय ठाकूर याने गुरुवारी दुपारच्या सामन्यात एसव्हीसी रॉयल्सविरुद्ध खेळताना सामनावीर होण्याचा मान मिळविला. या सामन्यात त्याने फलंदाजी करताना १९ चेंडूत झटपट १६ धावा काढल्या, तर गोलंदाजी करताना चार षटकात तीन गडी बाद केले. दि. १८ रोजी झालेल्या सामन्यात दि स्टार वॉरिअर्स विरुद्ध त्याने ३६ चेंडूत ४९ धावा करताना पाच चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले, तर गोलंदाजी करताना दोन षटकात १३ धावा देत एक गडी बाद केला. फलंदाजी करताना झटपट धावा काढण्यात त्याचा हातखंडा असल्याचे मत प्रशिक्षक अतुल गोसावी यांनी व्यक्त केले. मैदानात क्षेत्ररक्षण करताना तो जी चपळता दाखवितो ती बघितल्यावर प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात. नियमित सराव करून क्रिकेटच्या विविध स्पर्धेत तो खेळतो. एनपीएलमध्ये त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. आंतरजिल्हा आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.
सामनावीर
फोटो क्रमांक २२ पीएचजेए७२
दि स्टार वॉरिअर्सचा सोहम गज्जर
लोकमत एनपीएल क्रिकेटमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात मराठा वॉरिअर्सविरुद्ध खेळताना दि स्टार वॉरिअर्सचा खेळाडू सोहम गज्जर याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. या सामन्यात त्याने १४ चेंडूत दोन चौकार मारत झटपट १७ धावा काढल्या, तर गोलंदाजी करताना दोन षटकात १३ धावा देत दोन गडी बाद केले. दि. १९ रोजी नाशिक चॅलेंजर्स विरुद्ध खेळतानाही त्याने चार षटकात आठ धावा देत तीन गडी बाद केले होते. क्षेत्ररक्षण करताना मैदानावर चपळाईने चौकार अडविण्याचे त्याचे तंत्र वाखाणण्याजोगे असल्याचे मत त्याचे प्रशिक्षक विजय कपूर यांनी सांगितले. आंतरमहाविद्यालयीन व आंतरजिल्हा क्रिकेट खेळताना तो त्याच्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन नेहमीच दाखवितो. झटपट धावा काढण्यात त्याचा हातखंडा आहे. तसेच गोलंदाजी करताना कमीतकमी धावा देत जास्तीत जास्त फलंदाज बाद करणारा गोलंदाज म्हणून त्याचा नावलौकिक आहे. लोकमत एनपीएल क्रिकेटमधील त्याची कामगिरी चमकदार राहिली आहे.
आजचे सामने- दुपारी १२.३० वाजता दि स्टार वॉरिअर्स विरुद्ध संदीप फाल्कन्स, सायंकाळी ५.३० वाजता नाशिक चॅलेंजर्स विरुद्ध नाशिक सुपरकिंग्ज
फोटो क्रमांक २२पीएचजेए७०
कॅप्शन: लोकमत एनपीएल क्रिकेट महोत्सवातील सामने बघताना नाशिक चॅलेंजर्स संघाचे मालक दिनेश पटेल व दीपक धीरवानी. समवेत ऋषी पटेल, पार्थ पटेल,नेहा पटेल, वंदना धीरवानी, उत्तरा पटेल व दिव्या धीरवानी. (सदरचाफोटोमोठावअवश्यघ्यावा.)

Web Title: Lokmat NPL Cricket-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.