लोकमत मुंबई महारथी खेळणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:24 AM2018-01-19T02:24:38+5:302018-01-19T02:24:55+5:30

प्रो रेसलिंग लीगच्या तिसºया सत्रातून आमचा संघाने माघार घेतल्याचे वृत्त ऐकून आम्हाला धक्का बसला. आमच्याविरुद्ध खोटी बातमी सर्वत्र पसरवली जात असून संघाच्या मालकाने स्पर्धेतून माघार

Lokmat will play Mumbai Superiors | लोकमत मुंबई महारथी खेळणारच

लोकमत मुंबई महारथी खेळणारच

googlenewsNext

नवी दिल्ली : प्रो रेसलिंग लीगच्या तिसºया सत्रातून आमचा संघाने माघार घेतल्याचे वृत्त ऐकून आम्हाला धक्का बसला. आमच्याविरुद्ध खोटी बातमी सर्वत्र पसरवली जात असून संघाच्या मालकाने स्पर्धेतून माघार घेण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही, अशी स्पष्टोक्ती लोकमत मुंबई महारथी संघाने केली आहे. प्रो रेसलिंग लीगच्या तिसºया सत्रासाठी बुधवारी रात्री मुंबई महारथी संघाचे सहमालक प्रदीप सहरावत यांनी स्पर्धा आयोजकांवर नाराज होत स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे धक्कादायक वृत्त पसरले होते. मात्र, मुंबई महारथ संघाने गुरुवारी या प्रकरणावर आपली बाजू स्पष्ट करतानाच माघार घेतल्याच्या वृत्ताचे खंडनही केले.
सहरावत यांनी याविषयी म्हटले की, ‘नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पीडब्ल्यूएलच्या तिसºया सत्रातून आम्ही माघार घेतल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्याचे पाहून आम्हाला धक्काच बसला. ही बाब पूर्णपणे चूकीचे असून आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.’ दरम्यान, वीर मराठाविरुद्ध मुंबई महारथी संघाची कर्णधार साक्षी मलिकने नाणेफेक जिंकून ७४ किलो वजनी गट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यास आयोजकांनी विरोध दर्शवल्यानंतर नाराज झालेल्या मुंबई महारथी संघाने स्पर्धेतून मागे हटण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त पसरले होते.
त्याचवेळी, गुरुवारी माघार घेतल्याचे खोटे वृत्त पसरल्याबद्दल मुंबई महारथीचे सहमालक सहरावत यांनी पीडब्ल्यूएलचे सीईओ सुनील कालरा यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली असून हे खोटे वृत्त पसरवण्यासाठी त्यांनी बिरबल स्पोटर््स अँड एंटरटेनमेंट या संस्थेला याप्रकरणी जबाबदार ठरले. ही संस्था पीडब्ल्यूएलच्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत असून पूर्ण तपास केल्यानंतर आम्ही या संस्थेशी सर्व संबंध तत्काळ तोडताना त्यांना आपल्या जबाबदाºयांतून मोकळे करण्यात आल्याचेही मुंबई महारथीने यावेळी स्पष्ट केले आहे.

Web Title: Lokmat will play Mumbai Superiors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.