लंडनच्या ‘कॉन्डे नॅस्ट’कडून ‘लोकमत महामॅरेथॉन’चा गौरव; भारतातील दहा निवडक मॅरेथॉनमध्ये केला समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 09:22 AM2021-11-27T09:22:26+5:302021-11-27T09:26:58+5:30

आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी लोकमत समूहाने औरंगाबादमध्ये २०१६ मध्ये पहिली महामॅरेथॉन आयोजित केली होती. त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही ती आयोजित केली जात असून, राज्य आणि देशभरातील व्यावसायिक आणि हौशी धावपटूंचे आकर्षण ठरली आहे.

London based Conde nast Traveller Honours Lokmat Maha Marathon | लंडनच्या ‘कॉन्डे नॅस्ट’कडून ‘लोकमत महामॅरेथॉन’चा गौरव; भारतातील दहा निवडक मॅरेथॉनमध्ये केला समावेश

लंडनच्या ‘कॉन्डे नॅस्ट’कडून ‘लोकमत महामॅरेथॉन’चा गौरव; भारतातील दहा निवडक मॅरेथॉनमध्ये केला समावेश

googlenewsNext

औरंगाबाद : एकाच वेळी अनेक शहरांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनचा, लंडनचे प्रख्यात पर्यटनविषयक नियतकालिक ‘कॉन्डे नॅस्ट ट्रॅव्हलर’ने २०२१-२२ मध्ये धावपटूंनी भाग घेतला पाहिजे अशा भारतातील दहा निवडक  मॅरेथॉनमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे जगभरातील धावपटूंचे लक्ष ‘लाेकमत महामॅरेथॉन’कडे आकर्षिले गेले आहे.

आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी लोकमत समूहाने औरंगाबादमध्ये २०१६ मध्ये पहिली महामॅरेथॉन आयोजित केली होती. त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही ती आयोजित केली जात असून, राज्य आणि देशभरातील व्यावसायिक आणि हौशी धावपटूंचे आकर्षण ठरली आहे. आता लंडनच्या जागतिक नियतकालिकाने या स्पर्धेची दखल घेतल्यामुळे जागतिक पातळीवरील धावपटूदेखील या स्पर्धेकडे आकर्षित होतील. या नियतकालिकाचे जगभरात ऑनलाईन व ऑफलाईन असे असंख्य वाचक असून, त्याची  भारतीय आवृत्तीही आहे. त्यामुळे लोकमत महामॅरेथॉनसाठी हे गौरवास्पद यश आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी औरंगाबादेत होत असलेल्या महामॅरेथॉनसाठी ही उत्साहवर्धक घटना आहे. ही महामॅरेथॉन ५, १० आणि २१ किलोमीटर गटात होणार आहे. 

काय आहे महामॅरेथॉन?
- लोकमत महामॅरेथॉन देश-विदेशातील धावपटूंसाठी आणि सर्वसामान्यांच्याही पसंतीची स्पर्धा ठरली आहे. 
- ही सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी एक आरोग्य चळवळ ठरली आहे. 
- सर्व क्षेत्रांतील, तसेच शहरी व ग्रामीण भागांतील नागरिक यात सहभागी होत आले आहेत.

लोकमत महामॅरेथॉनच्या दर्जावर शिक्कामोर्तब : रुचिरा दर्डा
-    ‘कॉन्डे नॅस्ट ट्रॅव्हलर’कडून भारतातील पहिल्या १० मॅरेथॉनमध्ये ‘लोकमत महामॅरेथॉन’ची निवड होणे हे महामॅरेथॉनच्या दर्जावर जागतिक पातळीवर झालेले शिक्कामोर्तब आहे, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना महामॅरेथॉनच्या संस्थापक संचालिका रुचिरा दर्डा यांनी व्यक्त केली. 
- श्रेय महामॅरेथॉनच्या संपूर्ण चमूला जाते. ही स्पर्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करण्याचाच सतत प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या.
 

Web Title: London based Conde nast Traveller Honours Lokmat Maha Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.