अ‍ॅथलेटिक्समधील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचं निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:32 IST2025-01-29T20:30:52+5:302025-01-29T20:32:57+5:30

वयाच्या ८९ व्या वर्षांपर्यंत डेंटिस्ट क्षेत्रात कार्यरत होता हा दिग्गज

long jump champion Greg Bell Oldest living Olympic gold medallist in athletics passes away | अ‍ॅथलेटिक्समधील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचं निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा

अ‍ॅथलेटिक्समधील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचं निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा

अमेरिकेचा दिग्गज अ‍ॅथलेटिक्स आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट ग्रेग बेल यांचे निधन झाले आहे. लांब उडी क्रीडा प्रकारात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या या दिग्गज खेळाडूनं वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हा दिग्गज खेळाडू मैदानी खेळातील  सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता होता. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अ‍ॅथलेटिक्समधील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट  

जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेनं शेअर केलेल्या माहितीनुसार,  बेल यांनी २५ जानेवारी अखेरचा श्वास घेतला. या महान खेळाडूनं १९५६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत लांब उडी क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. ऑलिम्पिक चॅम्पियन ग्रेग बेल यांचे शनिवारी वयाच्या ९४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. ही बातमी ऐकूण दु:खदायी आहे. हा महान खेळाडू अ‍ॅथलेटिक्समधील सर्वोत वयोवृद्ध ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता होता, असा उल्लेख करत जागतीक अ‍ॅथलेटिक्स महासंघाने महान खेळाडूला श्रद्धांजली वाहिली आहे.

इंडियानात जन्म, सैन्यात सेवा अन् लांब उडीत प्रभावी कामगिरी

१९५० मध्ये ग्रेग बेल यांनी पुरुष गटातील लांब उडी क्रीडा प्रकारात आपली छाप सोडली होती. ७ नोव्हेंबर १९३० मध्ये अमेरिकेतील इंडियाना येथील टेरे हाउट येथे त्यांचा जन्म झाला. गारफिल्ड हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यावर त्यांनी सैन्यात सेवा दिली. इंडियाना विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी लांब उडीत आपली एक ओळख निर्माण केली होती. 

सर्वोच्च कामगिरी अन् वर्ल्ड रेकॉर्डला हुलकावणी 

१९५६ मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करुन दाखवणाऱ्या या महान खेळाडूनं १९५७ मध्ये आपल्या कारकिर्दीी सर्वोच्च कामगिरीची नोंद केली होती. ८.१० मीटर ही त्यांची  लांब उडीतील सर्वोच्च कामगिरी राहिली. त्यावेळी अवघ्या ३ सेंटीमीटरनं वर्ल्ड रेकॉर्डनं या दिग्गजाला हुलकावणी दिली होती.  जो १९३५ जेसी ओवेन्स या लांबउडीपटूनं सेट केला होता. याआधी १९५६ मध्ये या दिग्गज अ‍ॅथलेटिक्सनं ८.०९ मीटर आणि १९५९ मध्ये पुन्हा ८.१० मीटर लांब उडीसह जगाचं लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. 

वयाच्या ८९ व्या वर्षांपर्यंत डेंटिस्ट क्षेत्रात कार्यरत होता हा दिग्गज

१९६० मध्ये खेळाच्या मैदानातून निवृत्त झाल्यावर ग्रेग बेल यांनी २०२० पर्यंत वयाच्या ८९ वर्षीपर्यंत डेंटिस्ट क्षेत्रात सक्रीय होते. लोगानस्पोर्ट स्टेट हॉस्पिटलमध्ये या खेळाडूनं तब्बल ५० वर्षे दंतचिकित्सक संचालकाच्या रुपात काम पाहिले. १९८८ मध्ये इंडियाना विद्यापीठ हॉल ऑफ फेम आणि यूएस नॅशनल ट्रॅक अँड फील्ड हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवून बेल यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली.  

Web Title: long jump champion Greg Bell Oldest living Olympic gold medallist in athletics passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.