भारताची नजर अग्रस्थानावर, चंदेलाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:38 AM2019-05-26T03:38:55+5:302019-05-26T03:39:02+5:30
जर्मनीतील म्युनिच येथे रविवारपासून विश्वकप रायफल, पिस्तूल स्पर्धा सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : जर्मनीतील म्युनिच येथे रविवारपासून विश्वकप रायफल, पिस्तूल स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेला, अंजूम मोदगिल व इलावेनिल वलारियान यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारातील स्पर्धा होतील. या स्पर्धेत ९८ देशांतील ९१९ नेमबाज सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी १७ जागांसाठी निवड केली जाणार आहे. भारताने या स्पर्धेत ३५ जणांचे पथक पाठवले आहे. पाच दिवस चालणा-या या स्पर्धेत दहा विविध प्रकारात २४ नेमबाज आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
भारताकडून रायफल व पिस्टल गटात पाच ऑलिंम्पिक कोटा मिळवला आहे. यात अपूर्वी चंदेलला, अंजुम, सौरव चौधरी, अभिषेक वर्मा व दिव्यांश सिंह पन्वार समाविष्ट आहेत. भारत या स्पर्धेतून जास्तीत जास्त १२ ऑलिम्पिक कोटा मिळवू शकतो.