गुजरात लायन्सची नजर पुनरागमनावर

By admin | Published: April 18, 2017 02:12 AM2017-04-18T02:12:41+5:302017-04-18T02:12:41+5:30

चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या गुजरात लायन्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या

Looking at the Gujarat Lions | गुजरात लायन्सची नजर पुनरागमनावर

गुजरात लायन्सची नजर पुनरागमनावर

Next

राजकोट : चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या गुजरात लायन्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गृहमैदानावर खेळल्या जाणाऱ्या या लढतीत लॉयन्स संघ विजयी पथावर परतण्यास उत्सुक आहे.
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा लायन्स संघ तिसऱ्या स्थानी होता, पण यावेळी मात्र हा संघ कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. कोलकाता नाईट रायडर्स व सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर लायन्सने रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध आयपीएलच्या दहाव्या पर्वात पहिला विजय नोंदवला. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील संघाला रविवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लायन्स संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे तर आरसीबी सर्वांत तळाला म्हणजे आठव्या स्थानी आहे. लायन्सचे आघाडीचे फलंदाज ब्रॅन्डन मॅक्युलम, अ‍ॅरोन फिंच, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्मात आहेत, पण त्यांना सांघिक कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन स्मिथला मुंबईविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही, पण सलामीवीर म्हणून मॅक्युलमच्या साथीने तो महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. क्रिकेट किट हरविल्यामुळे फिंच मुंबईविरुद्ध खेळू शकला नाही. लायन्स संघासाठी पहिल्या दोन लढतींमध्ये गोलंदाजी चिंतेची बाब ठरली होती, पण अ‍ॅन्ड्य्रू टायच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. टायने पुण्याविरुद्ध पाच बळी घेत चमकदार कामगिरी केली होती. त्यात हॅट््ट्रिकचाही समावेश होता. त्याने रविवारी मुंबईविरुद्धच्या लढतीतही दोन बळी घेतले. प्रवीण कुमार पहिल्या दोन षटकांत चांगली कामगिरी करीत होता. पुणे व मुंबई यांच्याविरुद्धच्या लढतीत त्याने लायन्स संघाला सुरुवातीला यशही मिळवून दिले, पण डेथ ओव्हर्समध्ये तो महागडा ठरला आहे. मुनाफने रविवारी पहिली लढत खेळताना एक बळी घेतला तर केरळच्या बासिल थम्पीने मुंबईविरुद्ध प्रभावी मारा केला.
जडेजाच्या पुनरागमनानंतरही फिरकीची बाजू कमकुवत भासत आहे. जकाती व कौशिक महागडे ठरले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या उपविजेत्या आरसीबी संघाची कामगिरीही निराशाजनक आहे. त्यांनी चार सामने गमावले असून केवळ एक विजय मिळवला आहे. कोहलीला दुखापतीमुळे पहिल्या दोन लढतींमध्ये खेळता आले नव्हते. त्याने पंजाबविरुद्ध ६२ धावांची खेळी केली होती, पण अन्य स्टार फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
आरसीबीविरुद्ध लढत आज
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात लायन्स :- सुरेश रैना (कर्णधार) ,अक्षदीप नाथ, शुभम अग्रवाल, बासिल थम्पी, ड्वेन ब्राव्हो, चिराग सुरी, जेम्स फॉकनर, अ‍ॅरोन फिंच, मनप्रीत गोनी, ईशान किशन, रवींद्र्र जडेजा, शादाब जकाती, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, शिविल कौशिक, प्रवीण कुमार, ब्रँडन मॅकुलम, मुनाफ पटेल, प्रथम सिंग, जेसन राय, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, शैली शौर्या, नत्थुसिंग, ड्वेन स्मिथ, तेजस बारोका, अ‍ॅन्ड्य्रू टाय.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), टाइमल मिल्स, अनिकेत चौधरी, प्रवीण दुबे, बिली स्टानलेक, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, मनदीप सिंग, अ‍ॅडम मिल्ने, सरफराज खान, श्रीनाथ अराविंद, केदार जाधव, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, सैमुअल बद्री, इक्बाल अब्दुल्ला, ट्रेविस हेड, सचिन बेबी, अवेश खान आणि तबरेज शम्सी.

Web Title: Looking at the Gujarat Lions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.