‘लॉर्ड्स' पावला

By admin | Published: July 22, 2014 02:23 AM2014-07-22T02:23:52+5:302014-07-22T12:52:36+5:30

इशांत शर्माच्या अचूक मा:यासमोर यजमान इंग्लंड संघाची दाणादाण उडाली आणि तब्बल 28 वर्षानंतर भारताने लॉर्ड्सवर कसोटी विजयाचा आस्वाद चाखला.

'Lords' turned | ‘लॉर्ड्स' पावला

‘लॉर्ड्स' पावला

Next
लॉर्ड्स : इशांत शर्माच्या अचूक मा:यासमोर यजमान इंग्लंड संघाची दाणादाण उडाली आणि तब्बल 28 वर्षानंतर भारताने लॉर्ड्सवर कसोटी विजयाचा आस्वाद चाखला. 
 
28 वर्षे 1 महिना व 11 दिवसांनंतर भारताने लॉर्ड्सवर कसोटी विजय साजरा केला.
1124 दिवसांनी आणि 15 कसोटींनंतर भारताने परदेशात पहिला विजय मिळवला.
पहिल्यांदाच भारताच्या दोन जलदगती गोलंदाजांनी एकाच कसोटीत सहाहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
07 विकेट्स घेऊन इशांत लॉर्ड्सवरील पाहुण्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करणारा पाचवा गोलंदाज ठरला.
 
1989 नंतर सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण आणि कुंबळे या पाच जणांव्यतिरिक्त भारताने पहिला कसोटी विजय मिळवला हे विशेष..
 
1983 साली वल्र्डकप विजेत्याचा मान भारताने येथेच वेस्ट इंडिजला 43 धावांनी नमवून मिळवला.
 
1986मध्ये भारताने इंग्लंडवर पाच विकेट्सने विजय साजरा केला होता.
 
2002साली नेटवेस्ट सीरिज फायनलमध्ये युवी आणि कैफच्या दमदार खेळीने भारताने इंग्लंडवर 2 विकेट्सने विजय साजरा केला.
 
2014मध्ये पुन्हा एकदा भारताचा दरारा दिसला. 95 धावांनी त्यांनी विजय मिळवला.

 

Web Title: 'Lords' turned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.