लव्ह इन पॅरिस, खेळासोबत मज्जाही; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २ लाखाहून अधिक कंडोम वाटप, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:21 PM2024-07-30T13:21:03+5:302024-07-30T13:21:41+5:30

सध्या पॅरिसमध्ये ओलिम्पिक स्पर्धेची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक खेळाडू पॅरिसला पोहचले आहेत. 

Love in Paris...fun with games; More than 2 lakh condoms distributed at Paris Olympics | लव्ह इन पॅरिस, खेळासोबत मज्जाही; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २ लाखाहून अधिक कंडोम वाटप, पण...

लव्ह इन पॅरिस, खेळासोबत मज्जाही; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २ लाखाहून अधिक कंडोम वाटप, पण...

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ११ हजाराहून अधिक खेळाडू ऍथलेटिक ३२ खेळांत सहभागी होणार आहे. ऑलिम्पिकमुळे या शहरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू एकाच ठिकाणी आल्याने पॅरिसमध्ये वेगळेच चित्र उभं राहिलं आहे. खेळाच्या महामेळ्यात सहभागी होण्यासाठी जेव्हा खेळाडू शहरात पोहचले तेव्हा त्यांचं एक कीट देऊन स्वागत करण्यात आलं. या किटमध्ये एक फोन, आवश्यक वस्तूंशिवाय कंडोमचं पॅकेट्ही आहे. 

रिपोर्टनुसार, ऑलिम्पिक विलेजमध्ये जवळपास २ लाख ३० हजार कंडोम वाटप करण्यात आलं आहे. त्याशिवाय प्रत्येक खेळाडूला २० कंडोम दिले आहेत. मात्र चर्चेचा मुद्दा भलताच आहे. २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये जसं एंटीसेक्स कार्डबोर्ड बेड होतं तसं पॅरिसमध्येही दिले आहेत. यातून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. जगभरातील खेळाडू या एंटी सेक्स बेडमुळे त्रस्त झाले आहेत. विशेषत: ऑस्ट्रेलियाई खेळाडूंनी याविरोधात मोर्चा उघडला आहे. याबाबत इन्स्टाग्रामवर हजारो रिल्स व्हायरल होत आहे.

इन्स्टावरील एका व्हिडिओत खेळाडू म्हणतोय की, हा बेड बकवास आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला बेडगेट २०२४ हा उल्लेख आहे. तर स्वत:च्या बेडवर अर्धवट झोपलेल्या अवस्थेत एका खेळाडूने फोटो शेअर करत स्क्रीनवर टेक्स्ट लिहिलं आहे. ज्यात लिहिलंय की, ओलिम्पिक कार्डबोर्ड बेडवर अपडेट...आज सकाळी तोंडातून निघालेला पहिला शब्द..जसं जसं व्हिडिओ पुढे जातो तसं तो खेळाडूंना दिलेल्या बेडबाबत तक्रार करताना दिसत आहे.

चांगली झोप नाही मग परफॉर्मेंस चांगला कसा होणार?

व्हिडिओत ऑस्ट्रेलियन खेळाडू टिली किर्न्सनं पोस्ट केलेल्या क्लिपचा काही भाग दाखवण्यात आला आहे. ती सांगते की, २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधील तिच्या देशाच्या ऑलिंपियन्सना कठीण बेडवर झोपणे सोपे करण्यासाठी मॅट्रेस टॉपर्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ३.६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. जर खेळाडू शांतपणे झोपू शकत नसतील तर ते चांगली कामगिरी कशी करू शकतात असा प्रश्न अनेकांनी विचारला.


एंटी बेडमागची कहाणी काय?

वास्तविक टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोविड १९ महामारीच्या काळात आयोजित केली होती. खेळाडूंनी एकमेकांशी जवळीक साधू नये म्हणून बेड तयार केले होते. त्या वेळीही, खेळाडूंनी हे बेड असमाधानकारक आणि कठीण असल्याचं म्हटलं होतं. आयोजन समिती पुनर्वापर करता येण्याजोग्या वस्तूंचा विचार करत होती आणि त्यामध्ये बेडची कल्पना देखील समाविष्ट करण्यात आली होती असं टोकियो ॲथलीट्स व्हिलेजचे सरव्यवस्थापक ताकाशी किताजिमा यांनी २०२० मध्ये एका निवेदनात सांगितले होते. 
 

Web Title: Love in Paris...fun with games; More than 2 lakh condoms distributed at Paris Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.