१९६८ ला नशीबवान ठरली इटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 02:05 AM2016-06-02T02:05:31+5:302016-06-02T02:05:31+5:30

४१९६८ ला झालेल्या तिसऱ्या स्पर्धेत इटलीने युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले. हे वर्ष या स्पर्धेसाठी क्रांतिकारक वर्ष म्हणावे लागेल कारण या वर्षी स्पर्धेचे नामकरण युरोपियन नेशन्स कपऐवजी

Lucky to Italy in 1968 | १९६८ ला नशीबवान ठरली इटली

१९६८ ला नशीबवान ठरली इटली

Next

४१९६८ ला झालेल्या तिसऱ्या स्पर्धेत इटलीने युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले. हे वर्ष या स्पर्धेसाठी क्रांतिकारक वर्ष म्हणावे लागेल कारण या वर्षी स्पर्धेचे नामकरण युरोपियन नेशन्स कपऐवजी युरोपियन चॅम्पियनशिप असे करण्यात आले. पात्रता फेरीची होम आणि अवे ही द्विस्तरीय पद्धत बदलून सहभागी संघांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करण्यात आले. चार गटांतील अग्रस्थानावरील संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात आले.
४रशिया, इटली, युगोस्लाव्हिया आणि इंग्लंड हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोेहोचले. इटली आणि रशिया यांच्यातील नेपल्स येथे झालेला सेमी फायनलचा सामना 0-0 असा बरोबरीत राहिला. या सामन्याचा निकाल नाणेफेकीवर ठरवण्यात आला. (तेव्हा पेनल्टी शूट आउट हा प्रकार अस्तित्वात नव्हता.) यात इटली ‘लकी’ ठरला. दुसऱ्या सामन्यात मात्र युगोस्लाव्हियाने इंग्लंडला १-0 ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
४८ जून १९६८ रोजी रोम येथे झालेल्या अंतिम सामन्याला ८५ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. युगोस्लाव्हियाच्या ड्रगन डिझॅजिकने ३२ व्या मिनिटाला गोल करून सामन्यावर वर्चस्व मिळवले. हा सामना युगोस्लाव्हिया जिंकणार, असे वाटत असतानाच इटलीच्या डोमेनगिन्ही याने ८0 व्या मिनिटाला बरोबरी साधली.
४जादा वेळेनंतरही हा सामना १-१ असा बरोबरीत राहिल्याने त्या वेळेच्या नियमानुसार बरोबरीत राहिलेला अंतिम सामना पुन्हा खेळवण्यात आला. १0 जून रोजीच्या ‘रिप्ले’ सामन्यात मात्र इटलीने युगोस्लाव्हियावर २-0 असा निर्विवाद विजय मिळवून युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली.

Web Title: Lucky to Italy in 1968

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.