लीन, नरेनची विक्रमी कामगिरी

By admin | Published: May 8, 2017 05:25 AM2017-05-08T05:25:38+5:302017-05-08T11:24:50+5:30

आयपीएलच्या या सत्रात गौतम गंभीरने सुनील नरेनला गोलंदाजीसोबतच सलामीवीराची भूमिका दिली, आणि त्याने ती यशस्वीपणे निभावलीदेखील

Lynn, Naren's record | लीन, नरेनची विक्रमी कामगिरी

लीन, नरेनची विक्रमी कामगिरी

Next

आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमत
आयपीएलच्या या सत्रात गौतम गंभीरने सुनील नरेनला गोलंदाजीसोबतच सलामीवीराची भूमिका दिली, आणि त्याने ती यशस्वीपणे निभावलीदेखील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरोधात खेळताना नरेनने फक्त १५ चेंडूतच अर्धशतक झळकावले, तर त्याआधी गोलंदाजी करताना दोन गडीदेखील बाद केले. ख्रिस लीन यानेदेखील २२ चेंडूत ५० धावा कुटल्या. आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार म्हणून गौतम गंभीर ओळखला जातो. केकेआरला दोन विजेतेपद त्याच्या नेतृत्वात मिळाले आहेत. यंदा त्याने यशस्वीपणे पार्ट टाईम ओपनरचा प्रयोग केला, आणि आजच्या सामन्यात तर त्याने ख्रिस लीन, सुनील नरेन यांना सलामीला पाठवले. दरम्यान, त्यांच्या वादळात आरसीबीचे माफक आव्हान केव्हाच उडून गेले. लीन आणि नरेन यांनी पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १०५ धावा काढण्याचा विक्रमही आपल्या नावे केला, याआधी हा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावे होता.

सीएसकेने २०१४ मध्ये पंजाब विरोधात पॉवर प्लेमध्ये १०० धावा केल्या होत्या, पार्ट टाईम ओपनर असलेल्या लीन आणि नरेन यांनी या विक्रमालाही मागे टाकले. नरेन बाद झाल्यावरही गंभीरने कॉलीन ग्रॅण्ड डी होमला फलंदाजीसाठी पाठवून नवा प्रयोग करून पाहिला. त्यात तो या सामन्यात यशस्वी ठरला. बद्रीचे चौथे षटक नरेनसाठी फायद्याचे ठरले, त्याने सलग तीन षटकार ठोकले. नरेनने ५४ पैकी ४८ धावा चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने वसूल केल्या. आरसीबीच्या दिग्गजांची हाराकिरी या सामन्यातही कायम राहिली. हिरवी जर्सी घालून मैदानात उतरलेल्या आरसीबीला १५८ धावा करता आल्या. मनदीप सिंहने अर्धशतक झळकावले, तर शेन वॉटसनच्या जागी संधी मिळालेल्या ट्रॅव्हिस हेड याने ७५ धावा झळकावल्या. मात्र इतर फलंदाजांना या सामन्यातही सूर न गवसल्याने संघाला मोठा फटका बसला. १५८ धावांचे माफक आव्हान केकेआरने १६व्या षटकातच पूर्ण केले. या आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या रॉयल चँलेंजर्सची स्पर्धेतून सन्मानाने निरोप घेण्याची आणखी संधी निसटली आहे. आरसीबीचा अखेरचा सामना १४ मे रोजी दिल्ली सोबत होणार आहे. ही स्पर्धा विराट कोहलीसाठी निराशाजनकच राहिली आहे. या सामन्यातील विजयाने केकेआर गुणतालिकेत पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. १२ सामन्यांत ८ विजयांसह केकेआरने दुसरे स्थान गाठले आहे.

Web Title: Lynn, Naren's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.