मध्य प्रदेशचा झारखंडवर निसटता विजय
By Admin | Published: April 3, 2015 12:39 AM2015-04-03T00:39:12+5:302015-04-03T00:39:12+5:30
फलंदाजांची सामूहिक कामगिरी आणि गोलंदाजांनी केलेल्या अचूक टप्यांवरील माऱ्यामुळे मध्य प्रदेशने सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट
भुवनेश्वर : फलंदाजांची सामूहिक कामगिरी आणि गोलंदाजांनी केलेल्या अचूक टप्यांवरील माऱ्यामुळे मध्य प्रदेशने सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झारखंडवर ९ धावांनी निसटता विजय मिळविला.
मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करत सहा गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या. कर्णधार मोहनिश मिश्रा लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर जलज सक्सेना (२४), जाफर अली (२९), उदित बिर्ला (२८) आणि हरप्रित सिंग (३१) यांनी डावाला आकार दिला. यांच्या कामगिरीमुळेच मध्य प्रदेशला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळाले.
हरप्रित सिंगने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही करामत केली. त्याने २२ धावा देऊन दोन बळी मिळविले.
सुपर लीगमध्ये मध्य प्रदेशने या विजयासह आपल्या अभियानाची सुरुवात केली, तर झारखंडला
सलग दुसऱ्या पराभवला सामोरे
जावे लागले. (वृत्तसंस्था)