माद्रिद ओपन : ‘लाल माती’चा बादशहा पराभूत, उपांत्यपूर्व लढतीत ज्वेरेवची नदालवर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:57 IST2021-05-09T04:16:04+5:302021-05-09T06:57:40+5:30
या वर्षाच्या सुरुवातीलादेखील ज्वेरेवने नदालवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मात केली होती.

माद्रिद ओपन : ‘लाल माती’चा बादशहा पराभूत, उपांत्यपूर्व लढतीत ज्वेरेवची नदालवर मात
माद्रिद : फ्रेंच ओपन टेनिसच्या तयारीसाठी महत्त्वपूृर्ण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या माद्रिद ओपनमध्ये ‘लाल मातीचा बादशहा’अशी ख्याती असलेला स्पेनचा दिग्गज राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाला. १३ वेळेचा चॅम्पियन नदालला सहावा मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव याने ६-४, ६-४ असे सरळ सेट्समध्ये नमविले या वर्षाच्या सुरुवातीलादेखील ज्वेरेवने नदालवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मात केली होती. आता तो पुढच्या आठवड्यात इटालियन ओपन खेळणार आहे. पराभवानंतर नदाल म्हणाला, ‘मी फार निराशावादी असल्यासारखे वाटत आहे. हा आठवडा माझ्यासाठी फारच महत्त्वपूर्ण होता.’
या वर्षाच्या सुरुवातीलादेखील ज्वेरेवने नदालवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मात केली होती. आता तो पुढच्या आठवड्यात इटालियन ओपन खेळणार आहे. पराभवानंतर नदाल म्हणाला, ‘मी फार निराशावादी असल्यासारखे वाटत आहे. हा आठवडा माझ्यासाठी फारच महत्त्वपूर्ण होता.’