ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड

By admin | Published: November 23, 2014 02:27 AM2014-11-23T02:27:09+5:302014-11-23T02:27:09+5:30

ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत.

Madurai on the batting in Australia: Dravid | ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड

ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड

Next
मुंबई :  ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत. किंबहुना फलंदाजी हेच या दौ:यात यशाचे मुख्य गमक असेल असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला वाटत आहे.
ऑस्ट्रेलिया दौ:यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशात विजय मिळविण्यासाठी सल्ला देताना द्रविड म्हणाला, इंग्लंडमध्ये खेळण्यापेक्षा ऑस्ट्रेलियात खेळणो वेगळे आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा एक वेगळा अनुभव असेल, विशेषत: या मौसमात तेथील खेळपट्टी वेगळी असते आणि प्रेक्षकही भरपूर असतात.
 तो म्हणाला, ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया उसळी घेणा:या असतात. या खेळपट्टीवर खेळणो भारतीय खेळाडूंसाठी आव्हानात्मक असेल. परंतु एक गोष्ट चांगली असते की, तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहीलात की, धावा करणो सोपे जाते. इंग्लंडमध्ये असे नसते, तेथे काहीवेळा दिवसभर चेंडू स्विंग होत असतो.
या दौ:यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे भारतीय संघासाठी महत्त्चाची भूमिका बजावतील असेही द्रविड म्हणाला. 
 
दोन सराव सामने पुरेसे नाहीत : गांगुली
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने भारतीय संघाला सूर गवसण्यासाठी पुरेसे ठरणार नसल्याचे माजी कर्णधार सौरभ गांगुली याने म्हटले आहे. भारत-ऑस्ट्रेलियात 4 डिसेंबरपासून मालिकेला प्रारंभ होत असून, त्याआधी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
गांगुली म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियात चांगल्या कामगिरीसाठी कसोटी मालिकेआधी तयारी आवश्यक आहे. मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने ठेवण्यावर मी समाधानी नाही. याचा अर्थ असा, की कसोटीआधी भारताला केवळ दोन डाव खेळायला मिळतील.  विराटसारख्या खेळाडूला तयारीसाठी किमान चार डाव खेळायला हवेत.’’ 
परदेशात कसोटी सामने जिंकून देणारा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेला गांगुली पुढे म्हणाला, ‘‘ब्रिस्बेन येथे 2क्क्4मध्ये ऑस्ट्रेलियाने 323 धावा, तर आम्ही 45क् धावा केल्या. अॅडिलेड येथे आम्ही 55क्, तर ऑस्ट्रेलियाने 7क्क् धावा केल्या. हेडिंग्ले येथे 2क्क्2मध्ये आम्ही 6क्क्वर धावा काढल्या. त्या वेळी संघात सचिन, द्रविड, अनिल कुंबळे आणि लक्ष्मण होते. हे सर्व जण चांगली कामगिरी करू शकतात, याबद्दल आत्मविश्वास व्यक्त करीत होते.’’
विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल करू नये, असे ठाम मत व्यक्त करून सौरभ पुढे म्हणाला, ‘‘विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल हवा, असे मला वाटत नाही. धोनी हा परदेशातील कसोटी विजयाबद्दल चिंतेत असेल; पण माझी आणि त्याची नेतृत्वाबद्दल तुलना नको. 
आम्ही वेगवेगळ्या वेळी नेतृत्व सांभाळले. मी त्रिरंगी मालिकेची फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जाण्याचा मान मिळविला; त्याच पद्धतीने धोनीनेही संघाला अनेक फायनल खेळविण्याचा आणि जिंकण्याचा सन्मान मिळवून दिला आहे.’’ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Madurai on the batting in Australia: Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.