‘महामॅरेथॉन’चे महामेडल; लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘महा ब्रिलियंट’ आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 02:15 AM2017-08-24T02:15:16+5:302017-08-24T02:15:30+5:30
‘महा ब्रिलियंट’- या शब्दातच एक आगळीवेगळी संकल्पना दडली आहे. महाराष्ट्राचे ‘नंबर वन’ दैनिक असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने हा आविष्कार साकारला आहे.
मुंबई : ‘महा ब्रिलियंट’- या शब्दातच एक आगळीवेगळी संकल्पना दडली आहे. महाराष्ट्राचे ‘नंबर वन’ दैनिक असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने हा आविष्कार साकारला आहे. ‘धावणे’ अर्थात ‘रेस’ हे ज्यांनी आयुष्य मानले आहे, त्यांच्यासाठी ही संकल्पना आहे, असे खेळाडू अनेक किलोमीटर धावतात..., दम टाकतात..., घाम गाळतात पण पुन्हा धावतात... अखेर कुठल्या ना कुठल्या मेडलवर स्वत:चे नाव कोरतात. निर्धाराच्या विजयाचे प्रतीक असलेले हे मेडल त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी सांगणारे असते. त्यांच्या भावना मेडलच्या रूपाने जोपासल्या जातात.
लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यातील नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या चार प्रमुख शहरात महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे. पण ही सामान्य नव्हे तर ‘महाब्रिलियंट मॅरेथॉन’ असेल. आयोजन अविस्मरणीय ठरविण्यासाठी लोकमत समूहाने फार प्रयत्न केले असून तासन्तास मंथन केले. त्यातून काही कल्पक गोष्टी पुढे आल्या.
काही कल्पना निश्चितपणे स्वीकारण्यायोग्य होत्या. दीर्घकाळ चाललेल्या मंथन प्रक्रियेतून ज्या बाबींचा स्वीकार करण्यात आला, त्या शानदार अशाच आहेत.
ही संकल्पना एखाद्या ‘पझल्स’सारखीच आहे. जो स्पर्धक महाराष्टÑाच्या नकाशाचे पदक
जिंकेल त्याला आणखी एक
विशेष पदक ‘विशेष सर्किट मेडल’ प्रदान करण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण संकल्पनेबाबत अनेक धावपटूंसोबत चर्चा केली असता, सर्वांचे उत्तर एकच होते... ‘महा ब्रिलियंट’!
पदके जोडल्यास महाराष्ट्राचा नकाशा तयार होणार
ज्या शहरात महामॅरेथॉनचे आयोजन होणार आहे त्या शहराचा नकाशा असलेले पदक विजेत्यांना देण्यात येईल. उदा. नाशिक महामॅराथॉन विजेत्यांना देण्यात येणाºया पदकावर नाशिक शहराचा नकाशा असेल.
अन्य तिन्ही शहरांत होणाºया महामॅरेथॉन विजेत्यांना देखील त्या-त्या शहराचा नकाशा असलेले पदक प्रदान केले जाईल. जो स्पर्धक चारही शहरात आयोजित महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन पदके पटकवेल, ती पदके जोडल्यास ‘महाराष्टÑाचा नकाशा’तयार होणार आहे.