महामॅरेथॉन म्हणजे तंदुरुस्तीचा, आरोग्याचा जागर : पुनीत बालन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 05:56 AM2023-02-18T05:56:56+5:302023-02-18T05:57:31+5:30

मुळात काही लोकांना मॅरेथॉन म्हणजे फक्त धावणे किंवा लांब पल्ल्याचे धावणे एवढेच माहीत असते

Mahamarathon is a wake of fitness, health: Puneet Balan | महामॅरेथॉन म्हणजे तंदुरुस्तीचा, आरोग्याचा जागर : पुनीत बालन

महामॅरेथॉन म्हणजे तंदुरुस्तीचा, आरोग्याचा जागर : पुनीत बालन

googlenewsNext

भारतात मॅरेथॉन संस्कृती वाढत चालली आहे आणि महाराष्ट्रात ही संस्कृती वाढण्यात मोठा वाटा लोकमत महामॅरेथॉनचा आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून चांगला संदेश सामान्यांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे अनेक जण या स्पर्धेकडे आकर्षित होत आहेत आणि दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच जाणार आहे याचा आम्हाला विश्वास वाटतो. स्पर्धा आयोजित करणारी टीम ही मोठ्या प्रमाणावर कष्ट घेते म्हणूनच ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर सामान्यांपर्यंत पोचली आहे. स्पर्धा यशस्वी होण्यात प्रायोजकही महत्त्वाचे असतात. याखेरीज मोठमोठे कलाकार, व्यावसायिक, खेळाडू, नामवंत व्यक्ती आदींचा सहभाग या स्पर्धेमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. भरगच्च बक्षिसेही दिली जातात. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे स्पर्धा कोठे, कधी आहे याचे संपूर्ण तपशील दिले जातात. हे सगळे एक यशस्वी मॅरेथॉन कशी राबवावी याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

मुळात काही लोकांना मॅरेथॉन म्हणजे फक्त धावणे किंवा लांब पल्ल्याचे धावणे एवढेच माहीत असते. पण त्याहीपलीकडे विचार केला तर सहनशक्तीची कसोटी या स्पर्धेत लागते. या स्पर्धेचेही काही नियम असतात. ते पार करूनच स्पर्धा जिंकावी लागते. या स्पर्धेसाठी शारीरिक तंदुरुस्तीही महत्त्वाची बाब आहे. सहभागी स्पर्धक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे फार महत्त्वाचे असते. यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गही सध्या घेतले जात आहेत. यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात काही वेळ आपल्या आरोग्यासाठी म्हणून कुटुंबातील लहानांपासून ते वयस्करही स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. जर कोणी एखाद्या शहरातील लोकांचे आरोग्य कसे मोजायचे (इंडेक्स), असा प्रश्न विचारला तर त्याला मॅरेथॉनकडे बोट दाखवता येईल का, असे वाटून गेले. त्या शहरातील किती लोक भाग घेताहेत, किती किलोमीटर पळून दाखवताहेत हे निश्चितच एक परिमाण म्हणून बघता येईल असे वाटते. जरी मॅरेथॉनच्या दिवशी तुमच्या तंदुरुस्तीची कसोटी लागत असली तरी त्यासाठी वर्षभर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे आपोआपच तुमच्या जगण्याला एक शिस्तबद्धता येते. महामॅरेथॉनसारखे उपक्रम नेहमी आयोजित केल्यामुळे लोकांना धावण्याची प्रेरणा मिळते. अनेक भागात रनर्सचे ग्रुप तयार होतात आणि ते आणि वर्षभर सराव करत राहतात. एकमेकांना प्रोत्साहन, पाठिंबा देत आजूबाजूच्या नागरिकांनाही आपल्या गटात समाविष्ट करतात. सातत्य, चिकाटी, योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि तंदुरुस्तीविषयी जागरुकता या सर्व गोष्टी  नित्यनेमाने धावण्याचा सराव केल्यास साध्य होतात. यासाठी पुण्यासारख्या शहरात महामॅरेथॉनसारख्या स्पर्धा आयोजित केल्या जाणे अतिशय आवश्यक आहे.

n मॅरेथॉन म्हणजे सहनशक्तीची कसोटी 
n मॅरेथॉन म्हणजे आरोग्यविषयक संदेशासह विविध सामाजिक विषयांचे जागर
n मॅरेथॉन म्हणजे शहरातील लोकांचा आरोग्य इंडेक्स 
n ताणतणाव विसरुन आयुष्याला एक शिस्त लावणारा क्रीडाप्रकार म्हणजे मॅरेथॉन 
    पुनीत बालन, 
    अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

Web Title: Mahamarathon is a wake of fitness, health: Puneet Balan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.