महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:40 PM2020-06-08T12:40:43+5:302020-06-08T12:41:22+5:30

कोरोना व्हायरसचे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रविवारी राज्यात  3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85,975अशी झाली आहे

maharashtra 90 year old wrestler Choakaji Avhad beats coronavirus  | महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

Next

कोरोना व्हायरसचे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रविवारी राज्यात  3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85,975अशी झाली आहे. रविवारी नवीन 1924 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 39314 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 43591 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये 90 वर्षी पैलवान चोकाजी आव्हाड यांचा समावेश आहे.  

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

कुस्तीमधील कामगिरीच्या जोरावर आव्हाडयांनी रेल्वेत नोकरी मिळवली होती. कारकिर्दीत अनेक कुस्तीपटूंना चीतपट करणाऱ्या आव्हाड यांनी कोरोनावरही यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनामुळे आव्हाड यांच्या 56 वर्षीय मुलीचं निधन झाले होते. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या 81वर्षीय पत्नीला आयसीयूमध्ये भरती केलं गेलं. हे दोघंही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा मुलगा नवीन यानं ही माहिती दिली. तो म्हणाला,''बहिणीच्या निधानंतर आम्हाला सर्वांना धक्काच बसला होता, परंतु वडील कोरोनावर मात करतील हा विश्वास होता.''  आव्हाड यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की,''21 मे रोजी त्यांना पत्नीसह हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते रोज योगा करायचे, एक तास मेडिटेशन करायचे. रात्री झोपताना दूध प्यायला ते कधी विसरले नाही. ते सकारात्मक राहायचे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यात त्यांना मदत मिळाली. त्यांची पत्नीही ठीक झाली आहे.''

31 वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. ते स्टीम इंजिनमध्ये असिस्टंट ड्रायव्हर होते. त्यांनी भुसावळ ते ईगतपूरी, बडनेरा ते नागपूर असे इंजिन चालवले आहेत. नागपूरच्या या कुस्तीपटूला 'खानदेशची वीज' या नावानंही ओळखले जायचे.  

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

Web Title: maharashtra 90 year old wrestler Choakaji Avhad beats coronavirus 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.