महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम, आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:16 PM2019-03-18T18:16:13+5:302019-03-18T18:16:32+5:30
पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सोमवारचा दिवस गाजवला.
पंजाब : पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सोमवारचा दिवस गाजवला. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 8 मिनिटे 28.94 सेकंदाच्या वेळेची नोंद करताना स्वतःच्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेची पात्रता निश्चित केली. त्याच्यासह 1500 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सन, अजय कुमार सरोज आणि राहुल यांनी आशियाई स्पर्धेचे तिकीट पटकावले.
🚨Record Alert- NEW NATIONAL RECORD- Men's 3000SC- Avinash Sable (bib no. 181)- 8:28.94 (Previous Rec. Avinash Sable- 8:29.80)#IndianAthleticspic.twitter.com/2kn08lNyFw
— Athletics Federation of India (@afiindia) March 18, 2019
अविनाशने गतवर्षी 8 मिनिटे 28.94 सेकंदाची वेळ नोंदवताना 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला होता. त्याने 1981 मध्ये गोपाळ सैनी यांचा 8 मिनिटे 29.80 सेकंदाचा विक्रम मोडला होता. एका वर्षातच अविनाशने स्वतःच्या नावावर असलेला विक्रम सोमवारी मोडला.
1500 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सनने 3 मिनिटे 41.67 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अजय कुमार सरोज ( 3:43.57) आणि राहुल ( 3:44.94) यांनीही आशियाई स्पर्धेसाठीच्या 3:46.00 सेंकदाची पात्रता वेळ पार केली.
#FedCup2019 Men's 1500m Results-
— Athletics Federation of India (@afiindia) March 18, 2019
1 JINSON JOHNSON 3:41.67 @JinsonJohnson5
2 AJAY KUMAR SAROJ 3:43.57
3 RAHUL RAHUL 3:44.94 #Asian Athletics Championships Qualification Standard- 3:46.00#IndianAthletics@iosindiaoff@imrahultrehan@Media_SAI