ज्युनियर राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन

By admin | Published: June 14, 2017 06:28 PM2017-06-14T18:28:43+5:302017-06-14T18:28:43+5:30

पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली.

Maharashtra Champion in Junior National Football Championship | ज्युनियर राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन

ज्युनियर राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन

Next

 रोहित नाईक/ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 14 - येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली. तसेच, ज्युनिअर स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशनक कप पिकलबॉल स्पर्धेत मात्र राजस्थानने बाजी मारली. निर्णायक सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमुळे महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
डेहराडून येथील परेड मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ज्यूनिअर गटात महाराष्ट्राने जबरदस्त खेळ केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात कृष्णा मंत्रीने यश पाटीलचा ११-१, ११-४ असा धुव्वा उडवून सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात मात्र राजस्थानच्या गीतम शर्माने बाजी मारत यजमान उत्तराखंडच्या खुशी थोपाचे आव्हान ११-१, ११-० असे परतावले. तसेच, कांस्य पदकाची लढत महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये झाली. साक्षी बाविस्करने ॠतुजा कालिकेचा ११-५, ११-० असा पराभव केला.
मुलांच्या दुहेरी अंतिम लढतीत अजय चौधरी - मयूर पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने सुवर्ण पटकावताना झारखंडच्या मोहम्मद जैद - मोहम्मद शाबिद अन्सारी यांचा ११-३, ११-४ असा फडशा पाडला. मुलींच्या दुहेरीमध्ये इशीका मालोदे - सलोनी देवडा या महाराष्ट्राच्या जोडीने समिक्षा शेखावत - साक्षी शेखावत या राजस्थानच्या जोडीचा ११-४, ११-२ असा धुव्वा उडवला. मिश्र दुहेरीत निशा बरेला - कुलदीप महाजन या महाराष्ट्राच्या जोडीने तुफानी खेळ करताना कुलदीप - पिंकी या दिल्लीकरांचा ११-१, ११-० असा फडशा पाडून सुवर्ण पटकावले.
  
फेडरेशनमध्ये राजस्थान अव्वल
ज्यूनिअर गटात वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राला फेडरेशन कपमध्ये लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. राजस्थानने सांघिक जेतेपदावर कब्जा केला, तर महाराष्ट्राला निर्णायक सामन्यात केलेल्या चुकांचा फटका बसला. पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या आशिष महाजनला सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. राजस्थानच्या निखिल सिरोहने सुवर्ण पटकावले. महिलांचा अंतिम सामना राजस्थानच्या खेळाडूंमध्येच रंगला. महिला दुहेरीतही महाराष्ट्राला राजस्थानविरुध्द पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरीत यजमान उत्तराखंडने बाजी मारली. मिश्र दुहेरीत मात्र महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अतुल एडवर्डने युवा साक्षी बाविस्करसह खेळताना अश्वनी वधोवा - कविता शेखावत या राजस्थानच्या जोडीचे आव्हान ११-३, ११-५ असे संपवले. फेडरेशन कपमध्ये हे महाराष्ट्राचे एकमेव सुवर्ण ठरले.

Web Title: Maharashtra Champion in Junior National Football Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.