महाराष्ट्र केसरी 2020 : सोलापूरची दोन सुवर्णपदकांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:17 PM2020-01-04T14:17:46+5:302020-01-04T14:18:20+5:30

Maharashtra Kesari 2020 Result ; गादी विभाग मधील पैलवान रामचंद्र कांबळे व जोतिबा आटकळे यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली.

Maharashtra Kesari: Solapur earns two gold medals | महाराष्ट्र केसरी 2020 : सोलापूरची दोन सुवर्णपदकांची कमाई

महाराष्ट्र केसरी 2020 : सोलापूरची दोन सुवर्णपदकांची कमाई

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सोलापूर जिल्ह्याला दोन पदकाची कमाई झाली. गादी विभाग मधील पैलवान रामचंद्र कांबळे व जोतिबा आटकळे यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली.


गादी विभागातील ७९ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने  उस्मानाबादच्या रविंद्र खैरे याचा १४-३ गुणाधिक्याने पराभव करून सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली, तर रविंद्र खैरेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी काल संध्याकाळच्या सत्रात उपांत्य फेरीत रामचंद्रने कोल्हापूर च्या निलेश पवार वरती १३-४ गुण फरकाने विजय मिळवला. तर रवींद्र खरे याने श्रीधर मुळे वरती विजय मिळवला होता.


याचं वजनी गटातील कांस्य पदकाच्या लढतीत सातारच्या श्रीधर मुळीक याने लातूर च्या विष्णु तनपुरे वरती ७ विरुद्ध २ गुण फरकाने विजय मिळवत कांस्य पदक पटकावले. तर केवळ भिगारे (नगर) याने निलेश पवार वरती मात करत गटातील दुसऱ्या कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याने कोल्हापूरच्या रमेश इंगवले वरती विजय मिळवत सुवर्ण पदक पटकाविले, तर पुणे शहरातील संकेत ठाकुर याने कांस्य पदकाच्या झालेल्या लढतीत कोल्हापूर शहराच्या साईराज चौगुले याचा १०-० आशा गुणाधिक्याने पराभूत केले.


आजचे सकाळ च्या सत्रातील पदक विजेते..!

■ ५७ किलो अंतिम निकाल*

🥇 पैलवान ज्योतिबा अटकळे (सोलापूर जिल्हा) 

🥈 पैलवान रमेश इंगवले (कोल्हापूर जिल्हा) 

🥉 पैलवान संकेत ठाकुर (पुणे शहर) 
🥉 पैलवान अतिष तोडकर (बीड)

■ *७९ किलो अंतिम निकाल*
🥇 पैलवान  रामचंद्र कांबळे (सोलापूर) 

🥈 पैलवान रविंद्र खैरे (उस्मानाबाद) 

🥉 पैलवान केवल भिंगारे (अहमदनगर) 

🥉 पैलवान श्रीधर मुळीक (सातारा)

Web Title: Maharashtra Kesari: Solapur earns two gold medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.