महाराष्ट्र केसरी कुस्ती : रोहित कारले व अनिकेत मोरे यांना कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 04:36 PM2018-12-23T16:36:36+5:302018-12-23T16:37:29+5:30
९२ किलो गादी विभागातून सोलापुरचा सिकंदर शेख विरुद्ध अक्षय भोसले अशी कुस्ती होणार आहे.
मुंबई : जालना येथे सुरू असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. सकाळच्या सत्रात ९२ किलो व ६५ किलो वजनी गटातील माती व गादी विभागाच्या कांस्य पदकासाठी लढती झाल्या. माती विभागामध्ये ९२ किलो वजनी गटात हिंगोलीच्या ज्ञानेश्वर गादेकरने गोंदियाच्या संतोष जगतापला हरवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. तर, गादी विभागामध्ये ९२ किलो वजनी गटात पुण्याच्या रोहित कारले व सांगलीचा अनिकेत मोरे यांनी कांस्य पदक पटकावले.
गादी विभागामध्ये ६५ किलो वजनी गटात पुण्याच्या सागर लोखंडेने उस्मनाबादच्या बालाजी बुरुंगे याला नमवत, तर पिंपरी चिंचवडच्या योगेश्वर तापकीर याने पुण्याच्या सागर खोपडेला हरवून कांस्य पदकाची कमाई केली. ६५ किलो वजनी गटात माती विभागामध्ये पांडुरंग कावळे, उस्मानाबाद व लखन म्हात्रे, कल्याण अशा झालेल्या लढतीमध्ये पांडुरंगने कांस्यपदक पटकावले.
सायंकाळच्या सत्रात सुवर्णपदकासाठीच्या लढती होणार आहेत. ६५ किलो गादी विभागातुन कोल्हापुरचा सोनबा गोंगाणे विरूद्ध कोल्हापुरचा मानिक कारंडे अशी लढत होणार असुन माती विभागात सुरज कोकाटे आणि सुर्यकांत रूपनवर अशी लढत झडणार आहे.
९२ किलो गादी विभागातून सोलापुरचा सिकंदर शेख विरुद्ध अक्षय भोसले अशी कुस्ती होणार आहे. तर, माती विभागातून सुहास गोडगे विरूद्ध अनिल जाधव अशी कुस्ती पाहायला मिळणार आहे.