महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएशन आयोजित निवड चाचणी स्पर्धा अनधिकृत : डॉ. चंद्रजित जाधव
By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:37+5:302015-02-14T23:50:37+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र मॉडर्न खो-खो संघटनेने पहिली राज्यस्तरीय वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी पार्क स्टेडियम सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याचे संपूर्ण राज्यात परिपत्रकाद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएशनला भारतीय ऑलिम्पिक महासंघ, भारतीय खो-खो महासंघ, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व शालेय खेल महासंघ यांची कोणतीही मान्यता नाही. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, पालक, प्रशिक्षक, पंच व विविध जिल्ह्यांतील क्रीडा संघटक यांची फसवणूक होत आहे. तरी महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएश्नद्वारा आयोजित या अनधिकृत स्पर्धेत कोणीही सहभागी होऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांनी केले आहे.
औ ंगाबाद : महाराष्ट्र मॉडर्न खो-खो संघटनेने पहिली राज्यस्तरीय वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी पार्क स्टेडियम सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याचे संपूर्ण राज्यात परिपत्रकाद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएशनला भारतीय ऑलिम्पिक महासंघ, भारतीय खो-खो महासंघ, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व शालेय खेल महासंघ यांची कोणतीही मान्यता नाही. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, पालक, प्रशिक्षक, पंच व विविध जिल्ह्यांतील क्रीडा संघटक यांची फसवणूक होत आहे. तरी महाराष्ट्र मॉडर्न खो-खो असोसिएश्नद्वारा आयोजित या अनधिकृत स्पर्धेत कोणीही सहभागी होऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांनी केले आहे.या अनधिकृत स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, पालक, प्रशिक्षक, पंच व विविध जिल्ह्यांतील क्रीडा संघटक यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)