'सातारा'च्या पार्थ साळुंखेचा आयर्लंडमध्ये इतिहास; यू ट्यूबच्या मदतीने वडिलांनी मुलाला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 03:29 PM2023-07-10T15:29:07+5:302023-07-10T15:29:41+5:30
साताराच्या पार्थ साळुंखेने ( Parth Salunkhe) आयर्लंड येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
साताराच्या पार्थ साळुंखेने ( Parth Salunkhe) आयर्लंड येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत ११ पदकांची कमाई केली, परंतु सुवर्ण जिंकणारा पार्थ हा पहिला भारतीय ठरला. युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पार्थ हा भारताचा पहिला पुरुष तिरंदाज आहे. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. महाराष्ट्रातीलसातारा येथील १९ वर्षीय पार्थने २१ वर्षांखालील रिकर्व्ह फायनलमध्ये कोरियाच्या तिरंदाजाला पराभूत केले.
रँकिंग राऊंडमध्ये पार्थने ७व्या मानांकित साँग इन जूनविरुद्धच्या पाच सेटच्या अटीतटीच्या सामन्यात ७-३ ( २६-२६, २५-२८, २९-२६, २९-२६, २८-२६) असा विजय मिळवला. पार्थच्या यशात त्याच्या वडिलांचे खूप मोठे योगदान आहे. २०१२ मध्ये पार्थच्या प्रशिक्षकाने अचानक त्याची साथ सोडली. वर्षभर पार्थकडे प्रशिक्षकच नव्हता आणि त्याचा खेळावर परिणाम झाला. त्यामुळेच त्याच्या वडिलांनी ही जबाबदारी घेतली. पार्थचे वडील किक बॉक्सर होते आणि त्यांनी यू ट्यूबवर तिरंदाजी शिकली आणि त्यानंतर मुलाला शिकवले. २०१८च्या खेलो इंडिया स्पर्धेतील टॅलेंट स्काऊटची पार्थवर नरज पडली आणि तेथून तो साई सेंटरमध्ये गेला.
Parth Salunkhe's PURE DETERMINATION. 👏
— World Archery (@worldarchery) July 9, 2023
India has the new 2023 World Archery Youth Champion. 🇮🇳🇮🇳🇮🇳#WorldArcherypic.twitter.com/rTDPYDCDBA