महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धा; पर्णवी राणे, रिषी कदम यांनी राखला दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:24 AM2018-11-19T02:24:51+5:302018-11-19T02:25:01+5:30
पर्णवी राणे आणि रिषी कदम यांनी १४ वर्षांखालील गटाच्या आपापल्या सामन्यात रोमांचक बाजी मारत महावीर प्रसाद मोरारका स्मृती महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी आगेकूच केली.
मुंबई : पर्णवी राणे आणि रिषी कदम यांनी १४ वर्षांखालील गटाच्या आपापल्या सामन्यात रोमांचक बाजी मारत महावीर प्रसाद मोरारका स्मृती महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी आगेकूच केली.
वरळी येथील नेहरु सेंटर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या आठव्या फेरीत पर्णवीने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना साईली देसाई (४.५) हिचा पराभव केला. या शानदार विजयासह पर्णवीने १४ वर्षांखालील गटात अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी, प्रत्येकी ६ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी असलेल्या सानिया ताडवी आणि कियारा खतुरिया यांना आपापल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे दोघींची आता संयुक्तपणे दुसºया स्थानी घसरण झाली. काळ्या मोहºयांसह खेळणाºया सानियाचा संस्कृती सावंतने (५ गुण) पराभव केला. दुसरीकडे, मैत्रयी माने हिने (३.५) फॉर्ममध्ये असलेल्या कियाराला पराभवाचा धक्का दिला.
मुलांच्या आठव्या फेरीत रिषी कदम (७.५) याने सफेद मोहºयांसह खेळताना सहजपणे यश गोगाटे (४.५) याला नमवून गटातील अव्वल स्थान भक्कम केले. रचित एल. (७) याने आयुष मयेकर (५) याचा पराभव करत दुसरे स्थान पटकावले.