राष्ट्रीय तायक्वांदोसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:33 AM2017-12-26T02:33:38+5:302017-12-26T02:33:41+5:30

मुंबई : छत्तीसगड येथे २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणा-या ३७व्या राष्ट्रीय ज्यूनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra team for national taqwondo | राष्ट्रीय तायक्वांदोसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

राष्ट्रीय तायक्वांदोसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

Next

मुंबई : छत्तीसगड येथे २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणा-या ३७व्या राष्ट्रीय ज्यूनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान १०व्या राष्ट्रीय पुमसे तायक्वांदो स्पर्धाही पार पडणार आहे.
पुण्यात नुकताच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात मुंबई उपनगरचे दोन, तर मुंबई शहरच्या एका खेळाडूचा समावेश आहे.
तसेच ठाण्याच्या एका खेळाडूचीही संघात निवड झाली आहे. मुलींच्या संघात मुंबई शहर आणि उपनगरच्या प्रत्येकी एका खेळड़्य्ची निवड झाली आहे. पुमसे तायक्वांदो संघात पालघरचे एकहाती वर्चस्व राहिले असून सर्व खेळाडू पालघर जिल्ह्याचे आहेत.
>मुले : रिशी भालेकर (मुंबई), २. कौस्तुभ कसब (पुणे), ३. चंद्रकांत लोहार (सांगली), ४. अनिकेत कुचिकोरवी (सांगली), ५. निखिल सातपुते (सांगली), ६. चंचल शर्मा (मुंबई उपनगर), ७. सुजोग जगताप (ठाणे), ८. रितेश अगवाने (मुंबई उपनगर), ९. साहील घुगे (ठाणे) आणि १०. सौरभ जाधव (कोल्हापूर).
मुली : १. रोहिणी फड (अकोला), २. अंजली तायडे (अकोला), ३. मनिषा जाधव (सांगली), ४. पूनम खाशिद (अकोला), ५. जान्हवी फिरमे (सातारा), ६. मधु सिंग (मुंबई), ७. पूजा कांबळे (सांगली), ८. शिवानी चव्हाण (सांगली), ९. रुपाली काळोखे (सांगली) आणि १०. मेघा खरात (मुंबई उपनगर).
पुमसे तायक्वांदो संघ : १. आकाश पांचाळ, २. सूची सरोज, ३. यश गुरव, ४. प्राजक्ता बदगिरे, ५. साहील पाटील, ६. शुभम यादव, ७. हार्दिक शेट, आणि ८. निधी तानसे (सर्व पालघर जिल्हा)

Web Title: Maharashtra team for national taqwondo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.