महाराष्ट्राची मुले उपांत्य फेरीत; गतविजेत्या राजस्थानला नमविले, आता बिहारशी लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:17 PM2022-12-29T18:17:48+5:302022-12-29T18:18:32+5:30

 ३२व्या किशोर-किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. 

 Maharashtra team qualified for the semi-finals of the 32nd Youth Group National Kabaddi Tournament  |  महाराष्ट्राची मुले उपांत्य फेरीत; गतविजेत्या राजस्थानला नमविले, आता बिहारशी लढत

 महाराष्ट्राची मुले उपांत्य फेरीत; गतविजेत्या राजस्थानला नमविले, आता बिहारशी लढत

Next

झारखंड : महाराष्ट्राच्या मुलांनी "३२व्या किशोर-किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत" उपांत्य फेरी गाठली. झारखंड राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने बोकारो येथील एम जी एम हायर सेकंडरी शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने अत्यंत चुरशीच्या लढतीत गतविजेत्या राजस्थानचा प्रतिकार ४१-३५ असा मोडून काढत आगेकूच केली. महाराष्ट्राची उपांत्य लढत बिहारशी होईल. 

पहिल्या सत्रात १२-२३ असे ९गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या सत्रात धुव्वादार खेळ करीत हा विजय साकारला. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने गिअर बदलला. महाराष्ट्राच्या संदेश बिल्ले, गणेश टेकाम, श्रीधर कदम यांनी दुसऱ्या सत्रात चौफेर चढाया करीत भराभर गुण घेण्याचा सपाटा लावला. त्याला सारंग रोकडे यांनी भक्कम बचाव करीत मोलाची साथ दिली. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानच्या पारड्यातील विजय आपल्या बाजूला खेचून आणला. 

या अगोदर सकाळच्या सत्रात झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचे आव्हान ४६-३० असे परतवून लावले. महाराष्ट्राच्या मुलांनी सुरुवातीपासून आक्रमक धोरण ठेवत विश्रांतीला २२-१४ अशी आघाडी घेत आपला इरादा पक्का केला होता. उत्तरार्धात तोच पवित्रा कायम ठेवत १६ गुणांच्या मोठ्या फरकाने ही किमया साधली. दिघु दहातोंडे, श्रीधर कदम, संदेश बिल्ले यांच्या झंजावाती चढाया त्याला संदेश भोसले यांची पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा झाला. 

  

Web Title:  Maharashtra team qualified for the semi-finals of the 32nd Youth Group National Kabaddi Tournament 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.